शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! हिंदू व्यक्तीला रक्त देण्यासाठी त्याने सोडला रोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:30 IST

अजयला A+ या रक्तगटाची गरज होती.

उत्तराखंड- धर्माच्या मुद्द्यावरुन समाजात राजकारण सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. हिंदू तरुणाला रक्त देण्यासाठी मुस्लीम तरूणाने रोजा तोडून रक्तदान केल्याची घटना घडली आहे. 

उत्तराखंडमधील एका व्यक्तीच्या या पावलाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे.  20 वर्षीय अजय बिलावलम या तरूणाला कुष्टरोगाचं निदान झालं. त्याच्या रक्तातील पेशींचं प्रमाण घटायला सुरुवात झाली. रक्तातील पेशींचं प्रमाण झपाट्याने घटायला लागल्याने अजयच्या जीवाला धोका निर्माण झाला.  तेव्हा अजयची मदत करण्यासाठी एक मुस्लीम व्यक्ती धावून आला. अजयला A+ या रक्तगटाची गरज होती. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या वडिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत मित्र आणि ओळखीच्यांकडून रक्ताची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी इतरांना रक्तदानाचं आवाहन केलं.अजयच्या वडिलांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोस्ट वाचून आरिफ खान या तरुणाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आरिफने अजयच्या वडिलांना फोन करून रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. 

आरिफ रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर रक्तदान करण्याआधी डॉक्टरांनी त्याला काहीतरी खाण्याचा सल्ला दिला. पण, पवित्र रमजान महिना सुरु असल्यामुळे आरिफने रोजा ठेवला होता. त्यामुळे काही न खाता रक्तदान केलं तर चालेल का, अशी विचारणा त्याने केली. डॉक्टरांनी असं करण्यास नकार दिला. पण, आपल्या उपवासापुढे एखाद्याचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, कारण ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे, याच विचाराने आरिफने त्याचा रोजा सोडला आणि रक्तदान केलं.

रोजा सोडून अजयच्या मदतीसाठी पुढे गेलेल्या आरिफचं सगळीकडून कौतुक होतं आहे. अजयचं आयुष्य किती वाढेल हे ठावूक नसलं तरी कुष्ठरोगाशी लढण्यासाठी काहीशी जास्त वेळ आरिफच्या रक्ताने त्याला मिळाली आहे.  

टॅग्स :RamzanरमजानRamzan Eidरमजान ईदRamadanरमजानInfectious Diseaseसंसर्गजन्य रोग