शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 10:56 IST

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता.

अभिलाष खांडेकर

भोपाळ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथे त्यांच्या नावे राष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय तसेच लतादीदींचा पुतळा उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी केली. इंदूर येथे लता मंगेशकर यांच्या जन्म झाला होता. म्हणून या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. लतादीदींचा जन्म इंदूर येथे झाला असल्याची माहिती त्यांच्या आई माई मंगेशकर यांनी पत्रकार सुरेश गावडे यांना लिहिलेल्या एका पत्रात दिली होती. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर की ग्वाल्हेरमध्ये झाला याबद्दल १९९०च्या दशकात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी माईंनी लिहिलेल्या या पत्राची प्रत ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.

प्रख्यात अभिनेते बाबा डिके यांचे बंधू व कलावंत अरुण डिके यांनी सांगितले की, लतादीदी यांचे वडील व प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटक मंडळीला प्रयोग करण्यासाठी होळकर महाराजांनी इंदूरला येण्याचे निमंत्रण दिले होते. दीनानाथ मंगेशकर यांचा इंदूरला महिनाभर मुक्काम होता. त्यावेळी माई मंगेशकर गर्भवती होत्या. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला.

वाढदिवशी देणार पुरस्कारमध्य प्रदेशात दरवर्षी लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा प्रघात यापुढेही सुरू राहील, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. हा पुरस्कार मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी १९८४-८५च्या सुमारास सुरू केला होता. तो काही वर्षे नित्यनेमाने देण्यात येत होता. पण सरकारी अनास्थेमुळे पुढे त्यात खंड पडला होता. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरMadhya Pradeshमध्य प्रदेशcollegeमहाविद्यालय