शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाच गँगस्टर्सनी रचला मुसेवालाच्या हत्येचा कट, तपासातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 08:12 IST

Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट पाच गँगस्टर्सनी रचला. यात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराडचा समावेश आहे.

- बलवंत तक्षक चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट पाच गँगस्टर्सनी रचला. यात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराडचा समावेश आहे. तिहार जेलमध्ये रचलेला कट कॅनडामध्ये बसलेला गोल्डी ब्रांड व दुबईतील विक्रम बराडने प्रत्यक्षात उतरवला.या कटात महत्त्वाची भूमिका अनमोल बिश्नोई व सचिन थापर याने बजावली. पंजाब पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले की, मुसेवालाची रेकी करून गँगस्टर्स त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती शार्प शूटर्सला देत होते. मुसेवालाची हत्या बुलेटप्रूफ वाहनातच करावी, असा लॉरेन्स टोळीचा आग्रह होता. त्याचमुळे हत्येसाठी रशियन शस्त्रे एएन ९४चा वापर करण्यात आला. यातून झाडलेली गोळी बुलेटप्रूफ काचही भेदू शकते. मुसेवालाचे बुलेटप्रूफ वाहन नेमके कशा प्रकारचे आहे, याची माहिती घेण्यासाठी गँगस्टर्स जालंधरला गेले होते. तेथे त्यांनी कंपनीच्या लोकांशी चर्चा केली होती.

सप्टेंबरमध्ये मागवणार होता बुलेटप्रूफ जॅकेटमुसेवाला याला स्वत:च्या हत्येची शंका वाटत होती व त्यासाठीच तो अमेरिकेतून बुलेटप्रूफ जॅकेट मागवू इच्छित होता. त्यासाठी त्याने अमेरिकेतील आर्म्स डिलर विक्की मान सलौदी याच्याशी बातचीत केली होती. यानंतर मुसेवालाने लेव्हल थ्री हार्ड बुलेट जॅकेट मागविण्यास संमती दिली होती. हे जॅकेट एसएलआरमधून सोडलेली गोळीही रोखण्यास सक्षम आहे. अमेरिकेमधून सप्टेंबरमध्ये हे जॅकेट खरेदी केले जाणार होते. आपला एक मित्र हे जॅकेट घेण्यासाठी येईल, असे मुसेवालाने आर्म्स डिलरला सांगितले होते; परंतु तत्पूर्वीच मानसामध्ये २९ मे रोजी हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून मुसेवालाची हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. लाॅरेन्स बिश्नाेई हाच प्रमुख सुत्रधार असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारी