शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:22 IST

Karnataka Crime News: कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे.

कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणारं हे प्रकरण प्रत्यक्षाच महिलेच्या हत्येचं होतं. तसेच या प्रकरणात मृत महिलेच्या मुलीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून तिची हत्या केल्याचं समोर आलं.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या अल्पवयीन मुलीने तिचा प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून तिची हत्या घडवून आणली. मृत महिलेची ओळख नेत्रावती अशी पटली आहे. ती सर्कल मरम्मा मंदिर रोडजवळ कुटुंबासह राहत असे. तसेच एका लोन रिकव्हरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत असे.

नेत्रावती ही महिला तिच्या मुलीसह पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ही मुलगी दहावीत नापास झाली होती. तसेच ही १७ वर्षीय मुलगी एका १७ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली होती. या मुलाने नववीतून शाळा सोडली होती. हा मुलगा या मुलीच्या मावशीच्या मुलग्याचा मित्र होता. तसेच आरोपी मुलीचे मित्र आणि तिहा हा बॉयफ्रेड सतत घरी यायचे.

दरम्यान, नेत्रावती हिला मुलीच्या अफेअरची  कुणकुण हल्लीच लागली होती. तेव्हा तिने मुलीला चांगलेच खडसावले होते. तसेच तिचा प्रियकर असलेल्या मुलग्याला घरी येण्यास मनाई केली होती.  त्यानंतर काही दिवसांनी या  मुलीने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने कट रचून  आईचा टॉवेलने गळा आवळला आणि तिचा मृत्यू झाल्यावर मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितील लटकवून ही आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांनंत कुटुंबीयांनी अधिक खोलात जाऊन विचारणा केल्यावर तिने मित्रांनी आईची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक