शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊ मध्ये दोन साधूंची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:30 IST

अज्ञात मारेकऱ्यांनी मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या केली, शिवाय एका साधूला गंभीर जखमी केले. घटनेच्या निषेधार्थ आराया जिल्ह्यातील बिधुना भागात हिंसाचार उफाळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लखनऊ : अज्ञात मारेकऱ्यांनी मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या केली, शिवाय एका साधूला गंभीर जखमी केले. घटनेच्या निषेधार्थ आराया जिल्ह्यातील बिधुना भागात हिंसाचार उफाळल्याची माहिती पोलिसांनी दिली.जमावाने काही दुकाने जाळली, शिवाय दगडफेक केली. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.कानपूर रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिधुना पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुदारकोट भागातील भयानकनाथ मंदिर परिसरात दोन्ही साधू रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यांच्या मानेवर तसेच शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या.हत्येमागील हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गोहत्येला विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहखात्याचे प्रधान सचिव तसेच राज्य पोलीस महासंचालकांसह सर्व अधिकाºयांना घटनेचा ४८ तासांत छडा लावून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मृत दोन्ही साधूंच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी पाच लाख तसेच जखमी असलेल्या अन्य एका साधूला एक लाखाची मदत जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Murderखूनnewsबातम्या