शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत गुरगावात खून, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे; हरियाणा विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:14 IST

फरिदाबाद, सोनिपतही आघाडीवर; महिलांविरोधी गुन्ह्यांची संख्या वाढली

चंदीगड : गेल्या पाच वर्षांत हरियाणातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत गुरगावमध्ये बलात्काराच्या सर्वाधिक ६६३ आणि खुनाच्या ४७० घटना घडल्या, अशी माहिती विधानसभेत देण्यात आली. काँग्रेसचे सदस्य करणसिंह दलाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने उपरोक्त माहिती दिली. याच कालावधीत फरिदाबादेत बलात्काराच्या ५४३ आणि खुनाच्या ३३७ घटनांची नोंद झाली. सोनिपत जिल्ह्यात बलात्काराच्या २२९ आणि खुनाच्या ४४८ घटनांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.हरियाणातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत फरिदाबाद आणि गुरगावात बालकांवरील बलात्काराच्या अनुक्रमे ४१२ आणि ३५४ गुन्ह्यांची नोंद झाली. हे दोन जिल्हे महिलांविरोधी गुन्ह्यांच्या बाबतीतही आघाडीवर असून, गुरगाव जिल्ह्यात ४,५७७ आणि फरिदाबादेत ४,३१५ आणि पानिपत जिल्ह्यात ३,५९५ गुन्हे नोंदविण्यात आले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातहत भिवानीमध्ये ३०३, फरिदाबादमध्ये २८५, हिसार जिल्ह्यात २८०, रोहतकमध्ये २४३, पालवलमध्ये २०८ आणि गुरगाव जिल्ह्यात १९० गुन्हे नोंदविण्यात आले. नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत खून, बलात्काराची माहिती आमदार दलाल यांनी मागितली होती. (वृत्तसंस्था)नोव्हेंबर २०१४ पासून राज्यात खुनाच्या ५,९४३, बलात्काराच्या ४,८४७, पोस्कोतहत ३,६७४, महिलांविरोधी ४२,२६५ गुन्ह्यांची नोंद झाली, तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या ३,६९५ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.२० जुलै २०१९ पर्यंत खूनप्रकरणी ९५३ जणांना, बलात्काराच्या आरोपावरून २४९ जणांना आणि बालकांवरील बलात्कार प्रकरणात ४५७ जणांना दोषी ठरविण्यात आले, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Rapeबलात्कार