शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१२ पेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्काऱ्यास मृत्युदंड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 06:46 IST

फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, दोन महिन्यांत तपास पूर्ण होणार

नवी दिल्ली : १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आले.गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले. विधेयकाच्या उद्देश आणि कारणात स्पष्ट करण्यात आले आहे की, १६ वर्षे आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील बलात्काराच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. अल्पवयीन मुलींबाबत क्रूरता आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीच्या विधेयकांत तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यात म्हटले आहे की, बलात्काराच्या गुन्ह्यासाठीचा दंड ७ वर्षांच्या किमान कारावासाऐवजी वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे. याला वाढवून आजीवन कारावासही केला जाऊ शकतो. १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. यातही आजीवन कारावास केला जाऊ शकतो. १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. यात आजीवन कारावासही होऊ शकतो अथवा मृत्यूदंडही ठोठाण्यात येऊ शकतो. बलात्काराच्या सर्व प्रकरणातील तपास पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा