शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:30 IST

एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीसाठी मुलांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यास उशीर केला.

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीसाठी मुलांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यास उशीर केला. सुदामा देवीचा मृतदेह बरियारपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुलतानगंज स्मशानभूमीत आणण्यात आला. परंतु संपत्तीच्या वाटणीवरून मुलांमध्ये वाद झाला. त्यामुळे सहा तासांसाठी अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत झाले आणि अंत्यसंस्कार करता आले.

सुदामा देवी (८४) यांना आठ मुलं होती. यापैकी दोन मुलांचा आधीच मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा मुलं अरुण कुमार यादव, बरुण कुमार यादव, सुनील कुमार यादव, लाल मोहन यादव, सत्य नारायण यादव आणि रतनलाल यादव जिवंत आहेत. सुदामा देवीचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी, धाकटा मुलगा लाल मोहन यादव याने संपत्तीवरून वाद सुरू केला. हा वाद स्मशानभूमीतच इतर भावांसोबत झाला.

संपत्तीच्या वाटणीवरून भांडणं सुरू

सर्व भावांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून भांडण सुरू झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. कोणीही त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हतं. त्यामुळे सुदामा देवीचा मृतदेह सहा तास स्मशानभूमीत पडून होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांची गर्दी जमली. कोणीतरी बरियारपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. बरियारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मृत्युंजय कुमार स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी लाल मोहन यादव याला समजावून सांगितलं आणि मुलाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. यानंतर प्रकरण शांत झालं. 

लाल मोहन यादव याने त्यानंतर त्याच्या आईवर अंत्यसंस्कार केले. संपत्तीचा वाद अजूनही सुरू आहे. कुटुंब आणि नातेवाईक प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. संपत्तीच्या वादातून आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. संपत्तीच्या लोभात माणुसकी आणि नातेसंबंध विसरले गेले असल्याचं लोक म्हणत आहेत. 

टॅग्स :Biharबिहार