शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘पोर्नबंदी'साठी मुंबईची महिला सुप्रीम कोर्टात; नव-याविरुद्ध केली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:20 IST

पतीच्या पोर्न फिल्म्स (अश्लील चित्रफिती) पाहण्याच्या व्यसनामुळे आमचे वैवाहिक जीवन उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोर्नोग्राफीवर बंदी करण्यात यावी, अशी विनंती मुंबईतील २७ वर्षीय विवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

नवी दिल्ली : पतीच्या पोर्न फिल्म्स (अश्लील चित्रफिती) पाहण्याच्या व्यसनामुळे आमचे वैवाहिक जीवन उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोर्नोग्राफीवर बंदी करण्यात यावी, अशी विनंती मुंबईतील २७ वर्षीय विवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.या महिलेने म्हटले आहे की, ३५ वर्षे वयाचा आपला पती पोर्न फिल्म्स बघण्याच्या व्यसनात इतका बुडाला आहे की, दैनंदिन कामांवरुनही त्याचे लक्ष उडाले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक संबंध राखताना तो विचित्र मागण्या करीत असतो. परस्परसंमतीने घटस्फोट घ्यावा, यासाठी तो माझ्या मागे लागला आहे. त्यासाठी त्याने कुटुंब न्यायालयात अर्जही केला आहे. देशात पोर्नोग्राफीवर सरसकट बंदी घालावी यासाठी अ‍ॅड. कमलेश वासवानी यांनी २०१३ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वादी म्हणून सामील करुन घेण्याची विनंती तिने न्यायालयास केली आहे.चाइल्ड पोर्नोग्राफीच्या बंदीस केंद्र अनुकूलपती पोर्नोच्या आहारी गेल्याने वैवाहिक जीवन मोडकळीला येण्याचा धोका निर्माण झाला आहे असे गाºहाणे आणखी एका महिलेने गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले होते. त्याचप्रमाणे १२ वी इयत्तेत शिकणाºया एका मुलाने पोर्नोग्राफी साइट्स ब्लॉक कराव्यात, अशी विनंती न्यायालयाला केली होती. सार्वजनिक ठिकाणी पोर्नोग्राफीवर बंदी घालता येईल का, याची चाचपणी न्यायालय करीत आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, आपण चाइल्ड पोर्नोग्राफीच्या साइट््सवर बंदी घालण्याच्या बाजूचे आहोत. त्या पुढील वयोगटासाठीही बंदी घातल्यास नागरिकांच्या खासगी हक्कावर गदा येऊ शकते. आम्हाला मॉरल पोलिसिंग करण्याची इच्छा नाही.अत्यंत सहजपणे पोर्नो उपलब्ध असून त्याच्या जाळ््यात तरुण पिढी ओढली गेली आहे. त्यामुळे मूल्यांचा ºहास होत असून विकृतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच लैंगिक गुन्हे, वैवाहिक समस्या यांचे प्रमाण वाढू शकेल, असे तिचे म्हणणे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय