शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पायल पोकरणा यांनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा, बनल्या कुटुंबाचा आधारस्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 07:57 IST

प्रत्येक समाजाच्या अंत्यसंस्काराच्या काही चालीरीती असतात. जैन समाजात स्त्रिया बैकुंठी म्हणजे पार्थिवाला सहसा खांदा देत नाहीत.

रायपूर (छत्तीसगड) :

प्रत्येक समाजाच्या अंत्यसंस्काराच्या काही चालीरीती असतात. जैन समाजात स्त्रिया बैकुंठी म्हणजे पार्थिवाला सहसा खांदा देत नाहीत. मात्र मुंबईच्या पायल पोकरणा यांनी समाजाच्या चालीरीतीला छेद देत, आईच्या बैकुंठीला खांदा देत मुलाचे कर्तव्य पार पाडले. समाजातील एखाद्या महिलेकडून बैकुंठीला खांदा देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समाजातील जैन समाजातील जाणकारांनी सांगितले.

श्रीराम संगीत महाविद्यालयाजवळील बुढापारा येथील रहिवासी ६३ वर्षीय सरलादेवी कटारिया यांना मंगळवारी संथारा मरण आले. त्यांच्या मुलाचे आधीच निधन झाले असल्याने पश्चात केवळ मुलगी पायल पंकज पोकरणा आहे. पायल यांचे पती आणि सासरे मुंबईत सीए आहेत. आईची प्रकृती अस्वस्थ असून त्यांनी संथाराव्रत स्वीकारल्याचे कळताच मुंबईत राहणाऱ्या ४४ वर्षीय पायल तत्काळ आईच्या सेवेसाठी रायपुरात पोहचल्या. मागील १५ दिवसांपासून त्या आईची सेवा करीत होता. सरलादेवी यांना कॅन्सर झाला होता. परंतु जैन समाजातील संथारा या धार्मिक प्रथेचे अनुकरण करीत त्या समाधिस्थ राहिल्या व वेदनेपासून दूर राहिल्या. मंगळवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्कारासाठी बैकुंठीतून त्यांचे पार्थिव नेण्यात आले. समाजाच्या चालीरीतीनुसार बैकुंठीला मुलांनीच खांदा द्यायचा असतो. मात्र मुलगा नसल्याने पायलने मुलाचे कर्तव्य पार पाडले. बैकुंठीला खांदा देत त्या मुक्तिधामपर्यंत तासाभराचे अंतर चालत गेल्या. दरम्यान, समाजातील ज्येष्ठांनी त्यांना घरी परत जाण्याचा आग्रह केला; पण आईवरील दृढ प्रेमापोटी मुक्तिधामपर्यंत खांदा देत त्या चालत राहिल्या, एवढेच नाही तर दाहसंस्कारातही सहभागी झाल्या.

जैन समाजातील दुर्मिळ घटना - बरलोटाया संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश बरलोटा म्हणाले, जैन समाजात पार्थिवाला खांदा फक्त पुरुषच देतात. मात्र या प्रसंगात मुलीने खांदा देण्याची दुर्मिळ घटना म्हणजे परिवर्तनाचे पाऊल ठरले आहे. पायल पोकरणा यांच्या भावनांचा समाजाने आदर केला असून या प्रसंगातून एक अनुकरणीय आदर्श समाजापुढे ठेवला गेला आहे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी