शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांचा; ३२ कोटी लिटर इंधनाची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 08:01 IST

१५० किलोमीटवर अंतर होणार कमी, ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जाेडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे बनविला जात आहे. तब्बल १ लाख काेटी रुपये खर्च करून हा ८ पदरी महामार्ग बांधण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्प्रेस-वेमुळे हे अंतर १५० किलोमीटरने कमी होणार असून केवळ मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांमध्येच पूर्ण होणार आहे. 

केंद्रीय महामार्ग विकास आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की देशातील दाेन प्रमुख महानगरांना जाेडणारा १३५० किलाेमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली अंतर १५० किलाेमीटरने कमी हाेणार आहे. तसेच वाहतुकीस अडथळे कमी असल्याने दरवर्षी ३२ काेटी लीटर इंधनाची बचत हाेईल, असा अंदाज आहे. एक्स्प्रेस-वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हे अंतर केवळ १३ तासांमध्ये गाठता येईल. सध्या एक्स्प्रेस-वेचे ३५० किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे. 

संपूर्ण काम झाल्यानंतर केवळ वेळच वाचणार नाही, तर बाजूने औद्याेगिक टाउनशिप आणि स्मार्ट शहरेही उभारण्याची याेजना आहे. संपूर्ण मार्गात ९२ ठिकाणी इंटरव्हल स्पाॅट विकसित करण्यात येणार आहेत.

ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव

- एक्स्प्रेस-वेवर ८ लेन असून त्यापैकी दाेन्ही बाजूने प्रत्येकी दाेन, अशा चार लेन फक्त ई-वाहनांसाठी राहणार आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिला एक्स्प्रेस-वे राहणार आहे. त्यामुळे एकप्रकारे हा पर्यावरणपूरक एक्स्प्रेस-वे ठरणार आहे. यामुळे इंधनाचीही माेठी बचत हाेणार आहे.

- महामार्गाचा २४५ किलाेमीटरचा मार्ग मध्य प्रदेशातून जाताे. तेथे १०० किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची महामार्ग विकास आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून १६ सप्टेंबरला पाहणी करण्यात येणार आहे.

- महामार्गाऐवजी स्लिप लेनमध्ये टाेल प्लाझा बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या शहरात प्रवेश करायचा आहे, तेवढाच टाेल आकारण्यात येईल.

- चार लेन या फक्त ई-वाहनांसाठी राहणार आहेत. त्यांच्यासाठी महामार्गावर ठराविक अंतरावर चार्जिंगची साेय राहणार आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईdelhiदिल्ली