शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

गांधीहत्या तपासाचे 'मुंबई कनेक्शन', नथुराम गोडसेला मुंबईत कोणत्या इमारतीत ठेवण्यात आले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:40 IST

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली. महात्मा गांधीजींची हत्या दिल्लीमध्ये झाली असली तरीही या खटल्याचे संपूर्ण केंद्र मुंबईतच होते.

ठळक मुद्देगांधीहत्या खटल्याचा तपासाचे मुख्य केंद्र मुंबईतच होते. जे. डी. नगरवाला यांनी या तपासाचे नेतृत्त्व केले होते.

मुंबई- 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली. सायंप्रार्थनेला जाणाऱ्या महात्मा गांधीजींवरनथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच गांधीजींचे प्राण गेले. आज महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्षे होत आहेत. गांधीजींची हत्या दिल्लीमध्ये झाली असली तरीही या खटल्याचे संपूर्ण केंद्र मुंबईतच होते. मुंबई पोलिसांच्या इतिहासावर विशेष संशोधन करणाऱ्या दीपक राव यांनी गांधीहत्येच्या खटल्याबाबत काही विशेष बाबी लोकमतला सांगितल्या. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सहभागी असणारे सर्व मुख्य आरोपी हे तत्कालीन मुंबई प्रांतातले होते. गांधीजींचा मारेकरी दस्तुरखुद्द नथुराम गोडसे, गोपाळ गोडसेसह इतर संशयितही तत्कालिन मुंबई प्रांतातील होते. त्यामुळे तपासाची सर्व सूत्रे येथूनच हलवली गेली. गांधी हत्येचा तपास मुंबई स्पेशल ब्रँचचे उपआयुक्त जे. डी. नगरवाला यांच्या नेतृत्त्वाखाली झाला होता.

(गांधीहत्या खटल्याचा तपास करणारे जे. डी. नगरवाला)नथुराम गोडसेला आणले मुंबईतजे. डी. नगरवाला आणि दीपक राव हे मुंबईत एकाच इमारतीत राहात होते तसेच नगरवाला यांच्याबरोबर दीपक राव यांच्या वडिलांनीही काम केले होते. नगरवाला यांचे पूर्ण नाव जमशेद दोराब नगरवाला असे होते. नगरवाला 1936 साली इम्पिरियल पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. बलुचिस्तान आणि सिंध प्रांताच्या सीमेवर त्यांनी आपले कामकाज सुरु केले. नगरवाला यांना बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगची विशेष आवड होती. सहा फूटांहून उंच अत्यंत उत्तम शरीरयष्टी असणारे नगरवाला हे उत्तम घोडेस्वार होते असेही राव सांगतात.

17 फेब्रुवारी 1948 रोजी नगरवाला यांच्याकडे गांधीहत्येचा तपास सोपविण्यात आला. 1 मे 1960 रोजी गुजरात राज्याचे पहिले आयजीपी म्हणून त्यांची नेमणूक झाली. निवृत्तीनंतर नगरवाला यांनी आपणच नथुराम गोडसेला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला होता असे राव यांना सांगितले होते. महात्मा गांधीजींच्या हत्येच्या खटल्याची त्यांनी बहुतांश सर्व माहिती मनोहर माळगांवकर यांना दिली होती. गांधीहत्येवर आधारीत आणि तपासाबद्दल सर्व माहिती देणारे माळगांवकरांचे 'मेन हू किल्ड गांधी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 

नथुराम गोडसेला दोन आठवडे मुंबईत कोणत्या इमारतीत ठेवले?नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जनमानस संतापले होते. त्यामुळे नथुरामला मुंबईत आणल्यानंतर त्याला कोठडीत न ठेवता स्पेशल ब्रँचच्या एका मोठ्या खोलीत ठेवण्यात आले होते. या खोलीत दोन आठवडे त्याला ठेवण्यात आले होते. नगरवाला य़ांचे कार्यालयही तेथेच होते. आज येथे रेकॉर्ड विभाग आहे. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीMumbaiमुंबईNathuram Godseनथुराम गोडसे