शहरं
Join us  
Trending Stories
1
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ५ जण दगावल्याची भीती
2
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
3
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
4
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
6
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
7
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
8
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
9
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
10
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
11
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
12
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
13
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
14
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
15
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
16
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
17
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
18
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
19
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
20
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
Daily Top 2Weekly Top 5

भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:03 IST

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा ज्या लोकांना भेटला त्या लोकांसंदर्भातही त्याची चौकशी केली जाणार आहे...

अमेरिकेतून भारतात आणलेला मबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा सध्या १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत आहे. त्याच्या विरोधात भारतात खटला सुरू झाल्याने तो टेन्शनमध्ये दिसत आहे. दरम्यान त्याने त्याच्या वकिलाला या खटल्यासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे. एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिल्या माहितीनुसार, पटियाला हाऊस कोर्टात हजर होताना तहव्वुर राणाने त्यांच्या वकिलाला, "हा खटला एका वर्षात संपेल का?" असा प्रश्न केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणा भारतातील ट्रायलमुळे टेन्शमध्ये आला असून या प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर, राणाने न्यायालयाकडे कारागृहात कुराणाची प्रत मिळावी, अशी मागणी केली. त्याची ही मागणी मान्य करत न्यायालयाने NIA ला राणासाठी कुराण उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला. याशिवाय, पटियाला हाऊस कोर्टाच्या NIA विशेष न्यायालयाने राणाला त्याच्या वकिलांना भेटण्याची परवानगीही दिली. आता राणाचे वकील सोमवारी NIA कार्यालयात त्याची भेट घेतील.

एनआयएचा न्यायालयात मोठा दावा -पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तपास यंत्रणेने तपासादरम्यान गोळा केलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे राणाची चौकशी केली जात आहे. यात त्याच्या आणि डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानीच्या फोन कॉलचीही चौकशी केली जात आहे. हेडली सध्या अमेरिकेतील कारागृहात आहे. दरम्यान, राणाला न्यायालयासमोर हजर करताना, त्याने भारतीय अनेक शहरांना लक्ष्य करण्यासाठी २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखा दहशतवादी कट रचला होता, असा दावाही केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा ज्या लोकांना भेटला त्या लोकांसंदर्भातही त्याची चौकशी केली जाणार आहे.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद