शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

एक वर्ष आधीच धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - पियुष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 21:58 IST

भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली, दि. 11 : भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारी ही पहिली बुलेट ट्रेन असेल. मुंबईहून अहमदाबादला रेल्वेगाडीने जाण्यास सध्या (६५० किमी) सुमारे सात तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे दोन तासाहून कमी वेळात अहमदाबाद गाठता येईल.

14 सप्टेंबरला अहमदाबादमध्ये देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमीपूजन होत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत हे भूमीपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेनं 88 हजार कोटींचं कर्ज दिलं असून, हे आजवर भारताला मिळालेलं सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केला. 0.1 टक्के दरानं हे कर्ज 50 वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात आलं असून, हे कर्ज फेडण्याची सुरुवात 15 वर्षांनी होणार आहे.

अहमदाबाद-मुंबईसह देशभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पांची उभारणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड करीत आहे. अहमदाबाद-मुंबई प्रकल्पाच्या उभारणीसाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कॉर्पोरेशनला या प्रकल्पासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सुमारे एक हेक्टर जागा राज्य शासनाने देऊ केली आहे.बुलेट ट्रेन पाण्याखालूनही धावणारमुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल २१ किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे. त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गात २१ किलोमीटर अंतर समुद्रातील असून, तो भाग ठाण्याचा आहे. तिथे बुलेट ट्रेनसाठी समुद्रामध्ये बोगदे बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरवले असले तरी तो प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल, हे मात्र रेल्वेचे अधिकारी सांगू शकले नाहीत. याचे कारण प्रत्यक्ष काम सुरू व्हायलाच २0१८ साल उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार