शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बहुरंगी लढत : पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:03 IST

बहुमतासाठी ५९ जागा आवश्यक; मागील पाच निवडणुकांत मतदारांचा स्पष्ट कौल

- बलवंत तक्षकलाेकमत न्यूज नेटवर्कचंडीगढ : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी  मतदान पार पडल्या पासूनच यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज लावला जात अहे.  राज्यात संमिश्र सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी १० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला  ५९ जागा मिळणे आवश्यक आहेत.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल का?, आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल का?,  किंवा अकाली दल- बसपा आघाडी काही चमत्कार करील का?, अशीही चर्चा आहे. भाजपसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव ढिंढसा यांच्यासोबतची युती किती फायदेशीर ठरते? या सर्व प्रश्नांची उत्तरे १० मार्च रोजीच मिळतील. चर्चा काहीही होत असली तरी पंजाबच्या मतदारांनी गेल्या पाच निवडणुकीत स्पष्ट कौल दिला आहे. त्रिशंकू विधानसभा दिली नाही. तथापि, मतदानानंतर केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की,  सरकार कोणाचे येईल, हे ज्योतिषीच सांगू शकतील. अकाली दलाचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंग माजीठिया यांनीही असे संकेत दिले होते की,  सरकार स्थापन करण्यासाठी  भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची मदत घेतली जाऊ शकते.

काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व्यक्त करीत आहे; परंतु, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचे म्हणणे आहे की,  आघाडी सरकारसाठी काँग्रेस आणि आपचा समझोता होऊ शकतो. 

ज्या पक्षाचे जास्त आमदार,  त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. वास्तविक पाहता पंजाबमध्ये यावेळी एक विशिष्ट लाट नव्हती.  मालवामध्ये सत्ता परिवर्तनासाठी मतदानाचा जोर दिसला आणि  दोआबामध्ये मतदान साधारण झाले. मतदानाच्या टक्केवारीत जेव्हाही बदल झाला, तेव्हा पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे, हे विशेष. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास नाईलाजाने आघाडी स्थापन करावी लागेल, एवढे मात्र खरे आहे

कोण आहेत मैदानात?पंजाबमध्ये अगोदर काँग्रेस आणि अकाली-भाजप आघाडीत थेट लढत होत असे; यावेळी बहुरंगी लढत होती. यावेळी अकाली दल आणि भाजपने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. अकाली दलाने बसपासोबत, तर भाजपाचे अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत आघाडी केली आहे.  दुसरीकडे शेतकऱ्यांच्या २२ संघटनांचा संयुक्त समाज मोर्चाही यावेळी निवडणुकीत मैदानात उतरला आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२