शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सरकारने राज्यपालांचा अपमान केलाय, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

By महेश गलांडे | Updated: February 11, 2021 15:33 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं

नवी दिल्ली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीच वाढताना दिसत आहेत. आता, पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याने भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केलीय. तर, शिवसेनेकडून राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारच्या विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्यानं त्यांना विमानातून खाली उतरावे लागले होते. यासंदर्भात भाजपासह रिपाइं (आठवले) यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरुन पुन्हा खासगी विमानाने डेहरादूनला जावे लागले. त्यामुळे भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केलीय. तर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सरकारची भूमिका सांगितलीय. आता, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून राज्यपालांचा हा अवमान असल्याचं म्हटलंय. तसेच, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच माफी मागावी, असेही ते म्हणाले. आठवलेंनी दिल्लीतील संसद भवनाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत व्यक्त केलं.  

राज्य सरकारचे वर्तन अतिशय खराब आहे, राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. राज्यपालांचा हा अपमान आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. 

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, डेहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील, त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, या घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अख्यारित येते, तसेच राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे.

सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी

सुधीर मुनगंटीवार यांनी "राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल" असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर म्हणतात

प्रविण दरेकर म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. राज्यपालांच्या विमानाला परवानगी न देऊन सूड भावनेचा परमोच्च बिंदू गाठण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने  केलं आहे. राज्यपाल या पदाला अवमूल्यन करण्याचं काम सरकारमधील लोक करत आहेत. या पदाची प्रतिमा धुळीला मिळवण्याचं काम काही नेते मंडळी करताहेत" असं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या सूड भावनेचा अतिरेक झाला आहे. अशा पद्धतीने सूड भावनेने वागलेलं सरकार याआधी महाराष्ट्रात कधीच झालं नसल्याचं म्हणत दरेकरांनी निशाणा साधला आहे. 

हा तर राज्य सरकारच्या बदनामीचा कट

''महाराष्ट्र सरकारने राज्यपालांना एअरक्राफ्ट घेऊन जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे, परवानगी नसताना राज्य सरकारचं विमान घेऊन जाणं, ते विमान उडविण्यापूर्वी त्या विमानातील तांत्रिक बाबींची तपासणी करणे आवश्यक असते, पण तसे न करता विमान उडवणे योग्य नव्हतं. राज्यपालांनी विमानासाठी परवानगी मागितली होती, तरी त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. राज्य सरकारचं हे विमान फक्त मुख्यमंत्री आणि आपत्कालीन परिस्थितीतच वापरले जाते. त्यामुळे, राज्यपालांना या विमानाची परवानगी नव्हती, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. राज्यपाल आता स्पाईस जेट विमानाने डेहरादूनला गेले आहेत, जर स्पाईस जेटने ते इच्छित स्थळी गेले असतील, तर यापूर्वीच त्यांनी तिकीट काढून ठेवलं असेल. मग, केवळ राज्य सरकारने विमान नाकारले, असे दाखवून राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोपच राऊत यांनी केलाय. तसेच, भाजपा नेत्यांना नेहमीच राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करायला कारण हवं असतंय, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीairplaneविमानChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे