लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सप्टेंबर २०२५ सत्रातील सीए अंतिम, इंटरमिजिएट व फाउंडेशन परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर केले. मध्य प्रदेशातील धामनोदचा मुकुंद अगिवाल हा ८३.३३ टक्के मिळवून सीए अंतिम परीक्षेत देशात प्रथम आला. फाउंडेशन परीक्षेत चेन्नईची ए. राजलक्ष्मी तर इंटरमिजिएट परीक्षेत जयपूरची नेहा खनवानी देशात प्रथम आल्या. अंतिम परीक्षेत मुंबईच्या नील राजेश शाहने तिसरा क्रमांक मिळवला.
सीए अंतिम परीक्षा निकाल
ग्रुप १: ५१,९५५ विद्यार्थ्यांपैकी १२,८११ उत्तीर्णग्रुप २: ३२,२७३ पैकी ८,१५१ उत्तीर्णदोन्ही गटांत : १६,८०० विद्यार्थी; फक्त २,७२७ उत्तीर्ण
सीए इंटरमिजिएट परीक्षा निकाल
ग्रुप १: ९३,०७४ पैकी फक्त ८,७८० उत्तीर्णग्रुप २: ६९,७६८ पैकी १८,९३८ उत्तीर्णदोन्ही गटांत: ३६,३९८ पैकी फक्त ३,६६३ उत्तीर्ण
इंटरमिजिएट परीक्षेत जयपूरची नेहा खणवाणी ६०० पैकी ५०५ गुणांसह देशात पहिली आली. अहमदाबादची क्रिती शर्मा दुसरी, तर मुंबईचा अक्षत नौटियाल देशात ३ रा आला. एकूण ९८,८२७ पैकी १४,६०९ उत्तीर्ण झाले आणि त्यांची एकूण टक्केवारी १४.७८% आहे.
Web Summary : Mukund Agiwal secured first rank nationally in CA final exams. In foundation exams, Neel Rajesh Shah from Mumbai ranked third. ICAI announced results for final, intermediate, and foundation exams. Neha Khanwani topped intermediate exams.
Web Summary : मुकुंद अगिवाल ने सीए फाइनल परीक्षा में राष्ट्रीय स्तर पर पहला स्थान प्राप्त किया। फाउंडेशन परीक्षा में, मुंबई के नील राजेश शाह तीसरे स्थान पर रहे। आईसीएआई ने फाइनल, इंटरमीडिएट और फाउंडेशन परीक्षाओं के परिणाम घोषित किए। नेहा खनवानी ने इंटरमीडिएट परीक्षा में टॉप किया।