शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:11 IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसीच्या तयारीत

कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना आपल्या सोबत कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये जाण्याच्या तयारीत असल्यानं काल भाजप प्रदेश कार्यालयात नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या उच्चस्तरीय संघटनात्मत बैठकीला काही मोठे नेते अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. भाजपची सत्ता न आल्यानं बरेसचे नेते पक्ष सोडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे लवकरच बंगालच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो.ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीतकोलकात्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र या बैठकीला मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य आणि राजीव बॅनर्जी यांच्यासारखे दिग्गज नेते अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चिंतेचा विषय नाही, असं घोष म्हणाले. 'भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही. समिक भट्टाचार्य यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. तर राजीव बॅनर्जी वैयक्तीक कारणांमुळे अनुपस्थित आहेत,' असं घोष यांनी सांगितलं. मात्र बडे नेते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.ममता बॅनर्जींचं राजकारणराज्यात भाजपचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भाजपला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना दलबदलूंना आहे. ममता विरोधकांना किती कडवी टक्कर देतात, त्यांचे डावपेच कसे हाणून पाडतात, हे या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच घरवापसीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास ३० आमदार लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा