शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:10 IST

याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली :  मुख्तार अन्सारी यांच्यानंतर त्यांचा खासदार भाऊ अफजल अन्सारी यांनाही गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. गाझीपूरच्या खासदार एमएलए न्यायालयाने अफजल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा जाहीर होताच अफजल अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुख्तार अन्सारी यांना बांदा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली होती.दरम्यान, 23 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयात खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, न्यायालयाने निर्णयासाठी 15 एप्रिलची तारीख दिली होती, मात्र पीठासीन अधिकारी रजेवर असल्याने निर्णय होऊ शकला नाही. 

अखेर 29 एप्रिलला म्हणजेच आज निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. गँगस्टर प्रकरणात दोन वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. दरम्यान, आता गँगस्टर प्रकरणात अफजल अन्सारी यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदाराचे सदस्यत्व संपते. 

मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदारमुख्तार अन्सारी सध्या उत्तर प्रदेशमधील रोपर येथील तुरुंगात आहेत. या तुरुंगात अन्सारी यांना महत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जात आहे. अन्सारी यांच्यासाठी तुरुंगात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोय करण्यात आली आहे, असा आरोप पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारने केला आहे. तसेच अन्सारी यांना उत्तर प्रदेशमधून पंजाबमध्ये हलवण्यात आल्यामुळे भगवंत मान सरकारकडून मागील सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी असून ते माऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश