मुत्सद्देगिरी, रेल्वेत मोदी सरकारला सर्वाधिक गुण

By Admin | Updated: June 8, 2016 03:14 IST2016-06-08T03:14:42+5:302016-06-08T03:14:42+5:30

मोदी सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मुत्सद्देगिरी आणि रेल्वे या दोन क्षेत्रांत उत्तम कामगिरी केल्याचे एका आॅनलाइन सर्व्हेला लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून आढळून आले आहे.

Mukhsadagiri, Railway Minister | मुत्सद्देगिरी, रेल्वेत मोदी सरकारला सर्वाधिक गुण

मुत्सद्देगिरी, रेल्वेत मोदी सरकारला सर्वाधिक गुण


नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मुत्सद्देगिरी आणि रेल्वे या दोन क्षेत्रांत उत्तम कामगिरी केल्याचे एका आॅनलाइन सर्व्हेला लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून आढळून आले आहे.
सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ‘मायगव्ह डॉट इन डॉट’ या सरकारी पोर्टलवर आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करा, असे आवाहन प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी यांनी लोकांना केले होते. या आॅनलाइन सर्व्हेमध्ये किमान २० हजारांवर लोकांनी भाग घेतला. या सर्व्हेचा निष्कर्ष आज बुधवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mukhsadagiri, Railway Minister