शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Mukesh Ambani: 4G-5G पेक्षा आई-बाप कितीतरी पटीने मोठे; मुकेश अंबानींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 21:52 IST

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे.

रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनीच काही वर्षांपूर्वी देशभरात ४जी सेवा लाँच केली होती. आता ५जी सेवा देखील आणली आहे. करोडो लोक जिओद्वारे इंटरनेट डेटा वापरत आहेत. हे प्रमाण येत्या काळात आणखी वाढणार आहे. याच अंबानींनी तरुणवर्गाला या ४जी, ५जीवरून महत्वाचा सल्ला दिला आहे. 

देशातील तरुणाई ४जी, ५जी वरून खूप उत्साहित आहेत, परंतू त्यांना सांगू इच्छितो की माताजी, पिताजी पेक्षा कोणताही जी मोठा नाहीय. तरुणांनी त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाला विसरता नये, असा सल्ला अंबानी यांनी दिला. याचबरोबर त्यांनी 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल, असे भाकीत केले. स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती आगामी काळात भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरतील, असेही ते म्हणाले. 

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. आज तुमचा दिवस आहे. पण तुमच्या पालकांनी या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली आहे. त्यांच्या आयुष्यभराचे स्वप्न होते, त्यांचा संघर्ष आणि त्याग कधीही विसरू नका, असे अंबानी म्हणाले. भारताचा अमृत काळ सुरु असताना ही बॅच एका पदवीधर होत आहे. आपल्या परंपरेत अमृत काळ हा कोणत्याही नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो. भारताची अभूतपूर्व आर्थिक वाढ होईल आणि संधींचा पूर येईल, असेही ते म्हणाले. 

स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा मिळेल तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जेचा वापर योग्यरीतीने करण्यास मदत होईल. AI, रोबोटिक्स आणि IoT सारखे तंत्रज्ञान आमूलाग्र बदल घडवून आणतील. त्यांचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी