शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिव मंदिर तोडून मुगलांनी ताजमहाल बांधला - विनय कटियार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 4:16 PM

भाजपा आमदार संगीत सोम यांच्या ताजमहाल संबंधीच्या वक्तव्याने सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून रोज या वादामध्ये नवीन भर पडत आहे.

ठळक मुद्देपावसाळयात ताजमहालमध्ये ज्या ठिकाणी पाणी गळते तिथे शिवलिंग  होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहाल भारतीयच असल्याचे स्पष्ट केले.

लखनऊ - भाजपा आमदार संगीत सोम यांच्या ताजमहाल संबंधीच्या वक्तव्याने सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून रोज या वादामध्ये नवीन भर पडत आहे. आता उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार विनय कटियार यांनी ताजमहाल हिंदू मंदिर असल्याचा दावा केला आहे. ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे तिथे आधी शिव मंदिर होते. शिव मंदिर हटवून तिथे ताज महाल बांधण्यात आला  असे विनय कटियार यांनी सांगितले. 

मुगलांनी भारतात हिंदुची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली. ताजमहालमध्ये हिंदू देवी-देवतांची चिन्हे आहेत. त्यामुळे ताजमहाल हिंदू मंदिर आहे असे विनय कटियार म्हणाले. 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा प्रसार-प्रचार करण्यात विनय कटियार आघाडीवर होते. राम मंदिर आंदोलनातील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख होती. 

कालच मंगळवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहाल भारतीयच असल्याचे स्पष्ट केले. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे असे योगी म्हणाले होते. गी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एकप्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक होती. संगीत सोम यांच्या विधानावरुन हा संपूर्ण वाद सुरु झाला होता. 

ताजमहालबद्दल काय म्हणाले संगीत सोम उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

टॅग्स :Taj Mahalताजमहाल