एमटीएनएल आपल्या मालमत्तांची करणार विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:49 AM2020-01-04T02:49:50+5:302020-01-04T02:50:07+5:30

विक्रीतून २३ हजार कोटी रुपये उभे राहतील, कंपनीचा दावा

MTNL will sell your properties | एमटीएनएल आपल्या मालमत्तांची करणार विक्री

एमटीएनएल आपल्या मालमत्तांची करणार विक्री

Next

मुंबई : आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन न देऊ शकलेल्या व हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देणाºया एमटीएनएलने आपल्या मुंबई व दिल्लीतील मालमत्ता विकण्याचे ठरविले असून, त्यातून २३ हजार कोटी रुपये उभे राहतील, असा दावा कंपनीचे कंपनीचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी व्यक्त केला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांतील सुमारे ९0 हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्यानंतर मालमत्ता विकून कर्जमुक्त होण्याचे व कंपन्या नफ्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दिल्ली व मुंबईतील ६,२00 कोटींच्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव एमटीएनएलने सरकारला दिला आहे. त्याला संमती मिळाल्यानंतर या मालमत्ता विकून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचाºयांची सर्व देणी दिली जातील, असे सुनीलकुमार यांनी सांगितले. दोन्ही शहरांतील काही मालमत्ता विकून २३ हजार कोटी उभे राहतील. त्यातून सर्व देणी व कर्ज फेडली जातील आणि त्यानंतर एमटीएनएल पुढील आर्थिक वर्षात नफ्यामध्ये येईल, असा दावाही त्यांनी केला. स्वेच्छानिवृत्तीमुळे कंपनीचे दरवर्षी १,७00 कोटी रुपये वाचतील, असेही ते म्हणाले. आतापर्यंत एमटीएनएलच्या १४ हजार ३८७ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरून दिले आहेत. त्यामुळे कंपनीत सुमारे ४ हजार कर्मचारीच राहतील.

नंतर विलीनीकरण
एमटीएनएलच्या काही मालमत्ता भाड्याने दिल्या जातील. त्यातून दरवर्षी ५00 ते ६00 कोटी मिळू शकतील, असेही सुनीलकुमार म्हणाले. स्वेच्छा निवृत्ती घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर दोन्हींचे विलीनीकरण केले जाणार आहे.

Web Title: MTNL will sell your properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.