शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पश्चिम महाराष्ट्रातील ५५ सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत

By appasaheb.patil | Updated: March 24, 2023 15:24 IST

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली

नवी दिल्ली - माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडे नाईक - निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली. यावर मोदी यांनी सकारात्मकता दाखवित लवकरच मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिल्याची माहिती नाईक-निंबाळकरांनी दिली. 

यावेळी दिलेल्या निवेदन व चर्चा मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ,तेलंगाना, या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार ,सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर  प्रयत्न करावा, त्यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रकल्प मार्गे लावावा यासाठी  विशेष योजना तयार करून या ५५ दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत. हे दुष्काळी तालुके परंपरागत दुष्काळी म्हणूनच आजही गणले जातात  त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने निरा देवधर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे हे सांगितले . या प्रकल्पास आता  केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी ही मागणी केली.

याचवेळी मतदारसंघातील उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत, फलटण- पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून हे ही काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना दयावेत अशी ही विनंती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक यावर विचार होऊन लवकरच हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरNarendra Modiनरेंद्र मोदी