शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:46 IST

सभागृहाच्या सन्मानाला धक्का म्हणून कारवाई  : धनखड

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस  नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून खासदारांना निलंबित करण्याचे तपशीलवार कारण सांगितले आहे. 

शरद पवार यांनी म्हटले होते की, एखाद्याने दुसऱ्याची मिमिक्री केली तर ती एवढ्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हा एखाद्या जातीचा अपमान कसा असेल? उद्या कोणी माझी मिमिक्री केली तर तो मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे सांगणार का? तसेही हे सर्व सभागृहाच्या बाहेर झालेले आहे.

शरद पवार यांच्या या विधानानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना ज्येष्ठ खासदार संबोधून म्हटले आहे की, लोकसभेतील सुरक्षा भेदण्याची घटना अभूतपूर्व होती. अशी घटना घडता कामा नये. या घटनेनंतर सभापती सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांशी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यावर चर्चा करीत होते; परंतु १४ व १५ डिसेंबर रोजी काही खासदारांनी राज्यसभेत ज्या प्रकारे वर्तणूक केली, त्यामुळे राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे काही खासदारांना नाइलाजाने निलंबित करावे लागले आहे.

‘संसदेतील गंभीर चर्चेत ‘जात’ आणणे निराशाजनक’

संसदेतील गंभीर चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे अत्यंत निराशाजनक असल्याचे सांगून ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी २१ व्या शतकात या संकुचित ओळखीच्या पलीकडे जाण्याचे आवाहन लोकांना केले. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

टीका करण्यासाठी जन्मस्थळाचा वापर करणे निराशाजनक आहे. कोणी महात्मा गांधी किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांची जात किंवा सी. एफ. ॲण्ड्र्यूज किंवा ॲनी बेझंट यांचे जन्मस्थान विचारल्याचे मला  आठवत नाही. २१ व्या शतकात आम्ही हा संकुचित दृष्टिकोन त्यागून मानवतेची मूल्ये, नियम आत्मसात करू शकतो का, असेही ते म्हणाले.

‘आमचेही निलंबन करा म्हणून खासदार मागे लागले’सरकार लोकसभेतील सदस्यांना निलंबित करण्यास इच्छुक नव्हती, परंतु  काही विरोधी सदस्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतःलाही निलंबित करण्याची विनंती केली होती,” असा दावा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी केला. जोशी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेत मंजूर झालेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात विरोधकांची काही तक्रार असल्यास ते न्यायालयात जाण्यास मोकळे आहेत. “आम्हाला खासदारांना निलंबित करायचे नव्हते, आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र आम्ही काही सदस्यांना निलंबित केल्यावर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी निलंबनाची मागणी सुरू केली. काँग्रेसची पातळी इतकी खालावली आहे,” अशी टीकाही जोशी यांनी केली.

धनखड अस्वस्थसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या आपल्या मिमिक्रीनंतर धनखड अस्वस्थ आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी फोन करून अपमान सहन करण्याबाबत सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर म्हटले होते की, मी मागील २० वर्षांपासून अपमान सहन करीत आलो आहे.

पत्रात व्यक्त केले दु:खमान्य न होणाऱ्या मागण्या करत सभागृहाचे कामकाज ठप्प करणे दुर्दैवी व जनहिताच्या विरोधात आहे, असे धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खरगे यांनी त्यांना (धनखड) भेटण्यास नकार देणे हे संसदीय  परंपरेला धरून नसल्याचेही या पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSharad Pawarशरद पवारMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे