शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी खासदार कोटा रद्द; केंद्र सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 05:47 IST

शिक्षण मंत्री आणि अध्यक्ष यांनी केंद्रीय विद्यालयांच्या कामाची समीक्षा केली. स्थलांतर करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही प्राथमिकता द्यायला हवी. मात्र, तसे होत नव्हते.

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयातील प्रवेशांसाठी खासदारांच्या कोट्यासह इतर अनेक स्वेच्छाधीन कोटा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून (केव्हीएस) समीक्षेनंतर देशभरात विविध केंद्रीय विद्यालयातील विविध स्वेच्छाधीन कोट्यावर स्थगिती आणल्यानंतर काही आठवड्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशात १२०० हून अधिक केंद्रीय विद्यालये आहेत. यात १४.३५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २४५ सदस्यांकडून या कोट्याअंतर्गत एका वर्षात प्रवेशासाठी ७८८० पर्यंत शिफारशी करू शकतात. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी विचार केला जाईल.  या कोट्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचे शाळेतील गणित बिघडविले होते. 

शिक्षण मंत्री आणि अध्यक्ष यांनी केंद्रीय विद्यालयांच्या कामाची समीक्षा केली. स्थलांतर करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही प्राथमिकता द्यायला हवी. मात्र, तसे होत नव्हते. शिक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांची १०० मुले, संसद सदस्य आणि केंद्रीय विद्यालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांची मुले, नातू आदींसाठीचा कोटाही रद्द करण्यात आला आहे. ज्या विशेष तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत त्यानुसार, परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र प्राप्त करणाऱ्यांच्या मुलांना प्रवेश मिळू शकेल. 

खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना होते अधिकार विशेष तरतुदीनुसार, केंद्रीय विद्यालयात १० मुलांच्या प्रवेशासाठी शिफारस करण्याचे अधिकार खासदारांकडे होते. तर, जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी शिफारस करण्याचे अधिकार होते. हे विशेषाधिकार रद्द केल्याने वर्गातील गर्दी रोखण्यास मदत होईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी १ एप्रिल २०२२ च्या लोकमतमधील लेखात याच मुद्द्याचा ऊहापोह केला होता.