शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुकून जरी कोणी गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले तर...; ठाकरे गटाच्या नेत्याची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:57 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला.

Priyanka Chaturvedi on INDIA alliance : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून I-N-D-I-A या आघाडीची स्थापना केली आहे. पण, आता या आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर वाद चिघळल्याचे दिसते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली, त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. मात्र, यावर पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. 

प्रियंका चतुर्वेदींनी मांडली बाजू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला. त्या म्हणाल्या की, 'आप' नेत्यांचे हे काही प्रमाणात म्हणणे योग्य आहे. कारण जर कोणी मला विचारले की पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा, तर मी म्हणेन की उद्धव ठाकरे आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत. भाजपावर टीकास्त्र प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करताना म्हटले, "एका बाजूला आम्ही आहोत आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आहे, त्यातील सगळेच घाबरलेले आहेत. तिथे प्रत्येकजण फक्त एकच नाव घेऊ शकतो. चुकून जर कोणी नितीन गडकरींचे नाव घेतले तर त्याचे करिअर संपेल." 

 

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी मात्र 'आप' नेत्यांच्या विधानावर वेगळी भूमिका मांडली. चढ्ढा यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे वक्तव्य फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की आमचा पक्ष पंतप्रधानपदासाठी 'इंडिया' आघाडीत सामील झालेला नाही. अरविंद केजरीवाल हे भारताचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नाहीत. भारताला चांगले बनवण्यासाठी आम्ही भाजपाच्या विरोधात आलो आहोत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitin Gadkariनितीन गडकरी