शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:49 IST

या घटनेमुळे ग्रामस्थांच्या मनात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.

MP News: मध्य प्रदेशातून मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथील अशोकनगर जिल्ह्यातील नानकपूर गावात मुसळधार पावसात एका तरुणावर अंत्यसंस्कार करावे लागले. गावातील स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्यामुळे या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली. या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही, तर असंवेदनशीलतेची पराकाष्ठा आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुमार अहिरवार (२५) हा एका अपघातात जखमी झाला होता. उपचारानंतर तो घरी परतला, परंतु रविवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली अन् त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने त्याचा मृतदेह गावातील नवीन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणला, पण पंचायत सचिव सविता रजक यांनी स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्यामुळे अंत्यविधीस परवानगी नाकारली. 

मुसळधार पावसात अंत्यविधीअशा परिस्थितीत, कुटुंबातील सदस्यांना आणि ग्रामस्थांना जवळच्या एका मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करावी लागली. लोखंडी पत्र्यापासून एक तात्पुरते शेड बनवण्यात आले आणि त्याखाली तरुणावर अंत्यविधी झाला. पावसामुळे लाकडं पेटत नव्हती, त्यामळे चक्क डिझेल ओतून तरुणाचा मृतदेह जाळावा लागला. हे दृश्य पासून ग्रामस्थांच्या मनात तीव्र नाराजी आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही उद्घाटनाची वाट पाहायची का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, त्यांनी पंचायतीकडे अंत्यसंस्कारासाठी मदत आणि लाकडाची मागणी केली होती, परंतु कोणीही ऐकले नाही. तर, गावातील लोक म्हणतात की, स्मशानभूमी अनेक महिन्यांपासून तयार आहे, परंतु उद्घाटन न झाल्यामुळे ही अमानवी परिस्थिती उद्भवली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाGovernmentसरकार