शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार यांनी घाण शब्द त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे'; नवनीत राणांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:58 IST

नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतर नितीश कुमार यांनी जाहीर माफी मागितली. मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो, असं विधान नितीश कुमार यांनी केलं. 

नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. नितीश कुमार यांच्या डोक्यामध्ये किती घाण आहे हे त्यांनी आज बिहारच्या विधानसभेमध्ये बोलून देशवासियांना दाखवलं आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी घाण शब्द बोलले त्यांनी ते त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे होते, असा निशाणा नवनीत राणा यांनी साधला. नितेश कुमार यांचा माफीनामा नको, आम्हाला त्यांचा राजकारणातील राजीनामा हवा आहे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. नितीश कुमार यांना राजकीय क्षेत्रात बंदी आणली पाहिजे, अशाप्रकारे जर नितीश कुमार वक्तव्य करत असेल तर बिहारच्या महिलांनी कोणाकडे पाहायचे?, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात-

नितीश यांच्या वक्तव्यावर आमदारांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. भाजपा नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री हे वेगळ्या पद्धतीने बोलू शकले असते. तर भाजपा आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की, मुख्यमंत्री दुसऱ्या शब्दात समजावून सांगायला हवे होते. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता.

काय म्हणाले होते नितीश कुमार - 

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBiharबिहार