शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गरीब मुलांना फाईव्ह स्टारमध्ये नेऊन मंत्र्यानं साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:29 IST

ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री जीतू पटवारी यांनी खास शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली.जीतू पटवारी यांनी अनाथ आणि गरीब मुलांसोबत यंदा दिवाळी साजरी केली.पटवारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. आनंदात आणि मोठ्या उत्साहात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. ऐन दिवाळीत मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते जीतू पटवारी यांनी खास आणि वेगळ्या शैलीत यंदाची दिवाळी साजरी केली आहे. पटवारी यांनी इंदूरच्या रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गरीब मुलांना जेवायला नेऊन दिवाळी साजरी केली आहे. यामुळे जीतू पटवारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जीतू पटवारी यांनी अनाथ आणि गरीब मुलांसोबत यंदा दिवाळी साजरी केली आहे. लहान मुलांना घेऊन ते इंदूर येथील रेडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी गरीब आणि अनाथ मुलांना प्रेमाने जेवण भरवले. तसेच छान भेटवस्तूही दिल्या. पटवारी हे दरवर्षी मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी अशाच पद्धतीने दिवाळी आनंदात साजरी केली आहे. 

जीतू पटवारी यांचा मुलगा हॉस्टलमध्ये राहतो. दिवाळीच्या निमित्ताने मुलांने वडिलांना फोन केला होता आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत का? असा प्रश्न विचारला. त्यावर पटवारी यांनी हो, नक्कीच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं मुलाला सांगितलं. त्यानंतर ते अनाथ आणि गरीब मुलांना घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले. यानंतर सर्वच स्तरातून पटवारी यांचा भरभरून कौतुक होत आहे. 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली होती. त्याच दरम्यान प्रचार करताना काँग्रेसचे जीतू पटवारी  सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होती. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले. त्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDiwaliदिवाळी