शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: “प्रभू श्रीरामांनी सत्याचा मार्ग अवलंबला, पण पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:08 IST

Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीका केली आहे.

Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यावर जात रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्री अयोध्येला गेले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडत आहेत. 

ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेते शिंदे गटावर टीका करत आहेत. जे रामलल्ला यांच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत त्यांनी भक्त म्हणून दर्शन घ्यावे, राजकीय पर्यटक म्हणून जाऊ नये. या पवित्र ठिकाणाचा राजकारणासाठी वापर होताना पाहून वाईट वाटले. असे असले तरी ते केवळ ‘गद्दार’ आहेत, दुसरे काहीही नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. 

पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत

तसेच कपिल सिब्बल यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. प्रभू श्रीराम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्याग केला. बाळासाहेब ठाकरेंनीही हे गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सर्वांत आधी एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. हे सामायिक व्यासपीठ आपण नव्याने स्थापन केलेला ‘इन्साफ’ हा मंचही असू शकतो, असे ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलEknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या