शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 17:18 IST

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती.

बसपा सुप्रिमो मायावतींनी खासदार दानिश अली यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित केले आहे. संसदेत अली हे ज्या प्रकारे काँग्रेससोबत असल्याचे दिसल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

दानिश अली हे अनेकदा अनेक मुद्द्यांवर काँग्रेससोबत दिसत होते, तसेच काँग्रेसही अनेकदा त्यांच्या बाजुने दिसत होती. बसपाने अली यांना अनेकदा पक्ष तुमच्यासोबक असल्याचे समजाविले होते. परंतू, त्यांची काँग्रेससोबतची जवळीक काही कमी न झाल्याने मायावतींनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि खासदार प्रतापगढी देखील होते. यावेळी दानिश यांनी राहुल गांधी यांना भेटून मी एकटा नाहीय असे वाटल्याचे म्हटले होते. 

राहुल गांधी माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी इथे आले होते. या गोष्टींना मनाला लावून घेऊ नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, मला त्यांच्या बोलण्यावरून दिलासा मिळाला आहे तसेच मी एकटा नाहीय असे वाटले आहे, असे दानिश म्हणाले होते. यावरून बसपा सुप्रिमो नाराज झाल्या होत्या. बिधुडी यांनी लोकसभेत चंद्रयान ३ बाबत चर्चेवेळी दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. यावरून भाजपाने बिधुडींना कारणे दाखवा नोटीसही पाठविली होती. दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित बिधुडी यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेसने देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. बिर्ला यांनी बिधुडींना पाचारण करत त्यांना सक्त ताकीद दिली होती. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा