शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 05:56 IST

दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात ३० हून जास्त देशांच्या राजदूतांशी बैठका

नवी दिल्ली : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची तयारी भारताने सुरू केली असून, अमेरिकेसह विविधे देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क साधला जात आहे.

दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात ३० हुन जास्त देशांच्या राजदूतांशी बैठका घेण्यात आल्या असून त्यांना पहलगाम हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. हल्ल्याशी पाकिस्तानचे असलेले कनेक्शनही इतर देशांना सांगितले जात आहेत. अतिरेकी पाकिस्तानातून आल्याचे पुरावेही त्यांना दिले जात आहेत, असे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. पाकिस्तानला एकटे पाडण्याची तयारी सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिश, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान शिगोरु इशीबा, नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्कूफ, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलम, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही देशांनी भारताला दहशतवादाविरोधातील लढाईसाठी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

भारत-पाकने तणाव दूर करण्यास तोडगा काढावा : ट्रम्प

भारत- पाकिस्तान यांच्यात नेहमी तणाव असतो व ते दोघे त्यावर तोडगा काढतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारत-पाकिस्तानमधील तणाव संपण्यासाठी अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. मात्र तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांनी लवकरात लवकर तोडगा काढावा.

पारदर्शक तपासात सहभागी होण्यास पाक तयार : शरीफ

इस्लामाबाद : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ व पारदर्शक तपासात सहभागी होण्याची तयारी पाकिस्तानने शनिवारी दर्शविली. त्या देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वामधील पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीच्या पासिंग-आऊट परेड समारंभात शनिवारी म्हणाले की, हा हल्ला दुर्दैवी असून त्यावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळाला पूर्णविराम मिळायला हवा.

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा युनोने केला निषेध

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने कडक शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना तसेच पडद्यामागे राहून हल्ल्याचे नियोजन करणारे, मदतकर्ते आणि पैसे पुरवणारे या सर्वांना न्यायालयासमोर आणणे आवश्यक आहे. दहशतवाद कोणताही असो, त्यापासून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेस गंभीर धोका आहे, असे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी