शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आईच्या जिवाला धोका कायम! प्रसूतीदरम्यान 12% मृत्यू एकट्या भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:23 IST

१२% प्रमाण जगामध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होण्याचे असून, सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआई आणि नवजात बाळाचा जीव वाचविण्याबाबत देशभरात जागरूकता मोहीम सुरू असूनही भारतात गेल्या २३ वर्षांमध्ये तब्बल १३ लाख गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. गर्भावस्थेमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आणि प्रसूती होत असताना या महिलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये माता मृत्यूच्या प्रमाणाची (एमएमआर) राष्ट्रीय सरासरी १०३ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ प्रति एक लाख गर्भवती महिलांपैकी १०३ महिलांचा जीव गेला आहे. 

१२% प्रमाण जगामध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होण्याचे असून, सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.

गर्भवती महिलांच्या मृत्यूवर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायझेसच्या संशोधकांनी जिल्हानिहाय अभ्यास केला...

१९२ जिल्ह्यांत ७० पेक्षा कमी२१० जिल्ह्यांत ७० ते १३० १२४ जिल्ह्यांत १४० ते २०९ ११४ जिल्ह्यांत २१० पेक्षा+

६४० जिल्ह्यांचा देशातील समावेश आहे. 

२०१७ ते २०२० दरम्यान या जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला असून, यामध्ये गर्भधारणा झाल्यापासून ते प्रसूतीपर्यंत तसेच गर्भपाताच्या ४२ दिवसांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे.  मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची स्थिती उत्तम असून, अरुणाचल प्रदेशची स्थिती सर्वांत वाईट आहे.

प्रत्येक दिवशी ८०० महिलांचा मृत्यू    गर्भाशी संबंधित समस्यांमुळे जगभरात २००० मध्ये ४.५१ लाख महिलांचा मृत्यू झाला होता.     २०१७ मध्ये २.९५ लाख महिलांचा मृत्यू झाला.     उत्तम उपचाराची सोय असतानाही आज प्रत्येक दिवशी देशात तब्बल ८०० महिलांचा मृत्यू होत आहे.     सर्वांत जास्त मृत्यू हे आफ्रिकेच्या सब-सहारा, दक्षिण आशियाई देशांमध्ये (८६%) होतात.

७० पेक्षा कमीचंडीगड (१५), महाराष्ट्र (४०), पुद्दुचेरी (४१), केरळ (४४), तेलंगणा (५३), तामिळनाडू (५६), आंध्र प्रदेश (६४) २१० पेक्षा अधिकसिक्कीम (२२८), मणिपूर (२८२), मेघालय (२६६), अंदमान निकोबार (२७५), अरुणाचल प्रदेश (२८४) 

 

 

 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल