शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गेम खेळताना 2 मुलांची आई पडली अल्पवयीन मुलाच्या प्रेमात; घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 11:53 IST

प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली एक विवाहित महिला आपल्या मुलासह त्याच्या घरी पोहोचली. हे पाहून मुलाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

Free Fire हा ऑनलाईन गेम खेळत असताना उत्तराखंडमधील एक महिला मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका मुलाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली एक विवाहित महिला आपल्या मुलासह त्याच्या घरी पोहोचली. हे पाहून मुलाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले, त्यांनी महिलेला समजावून उत्तराखंडला परत पाठवलं.

सीधी जिल्ह्यातील सिहावल चौकीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला फ्री फायर गेम खेळण्याची सवय होती. या ऑनलाईन गेमिंगदरम्यान, अल्पवयीन मुलगा उत्तराखंडमधील एका महिलेच्या प्रेमात पडला. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली मुलाची आई उत्तराखंडमधून थेट आपल्या अल्पवयीन प्रियकराच्या घरी पोहोचली. याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. 

उत्तराखंडमधून आलेल्या महिलेला पाहण्यासाठी गावातील लोक जमले होते. अल्पवयीन मुलाचं कुटुंब त्या महिलेला कोणत्याही परिस्थितीत घरात ठेवण्यास तयार नव्हतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बरीच समजूत काढल्यानंतर महिलेला उत्तराखंडला परत पाठवण्यात आलं आहे. सीधी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्री फायर ऑनलाईन गेममुळे उत्तराखंडमधील एका महिलेचे सिहवाल चौकीतील अल्पवयीन मुलाशी प्रेमसंबंध होते. गावकरी आणि पोलिसांशी चर्चा केल्यानंतर महिलेला परत पाठवण्यात आलं आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.