शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:42 IST

एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याबाबत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.

जम्मूतील अर्निया येथील एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याबाबत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. शहीद गुरनाम सिंह आणि त्यांची आई जसवंत कौर यांची ही गोष्ट आहे. आईसाठी तिचा मुलगा हे जग सोडून गेलेला नाही. तो आजही तिच्या समोरच आहे, कारण ही एका आईची माया आहे.

२०२१ मध्ये जेव्हा अर्नियामध्ये कॉन्स्टेबल गुरनाम सिंग यांचा पुतळा बसवण्यात आला, तेव्हा जगासाठी ते अभिमानाचं प्रतीक होतं. मात्र आई जसवंत कौर यांच्यासाठी तो आजही त्यांचा 'लाडका' मुलगा आहे. २०२२ पासून दर हिवाळ्यात जेव्हा जम्मूमध्ये थंडीची पहिली लाट येते, तेव्हा जसवंत कौर एक उबदार ब्लँकेट घेऊन पुतळ्यापाशी पोहोचतात. त्या अत्यंत मायेने त्या पुतळ्याच्या खांद्यावर ब्लँकेट लपेटतात. हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावतात, पण आईच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान असते. जणू काही त्यांनी आपल्या मुलाला थंडीपासून वाचवलं आहे.

आई आठवणींना उजाळा देताना सांगतात की, २६ वर्षांचा गुरनाम जेव्हा शेवटचा भेटला होता, तेव्हा त्यांनी त्याच्या लग्नाची खूप स्वप्नं पाहिली होती. त्यांना वाटलं होतं की पुढच्या वेळी जेव्हा तो सुट्टीवर येईल, तेव्हा घरात सनई-चौघडे वाजतील. पण गुरनामच्या मनात काही वेगळंच होतं. त्याचं 'पहिलं प्रेम' त्याचा गणवेश आणि त्याचा देश होता.

२१ ऑक्टोबर २०१६ रोजी हिरा नगर सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी गुरनाम काळ बनला. त्यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिलं. २२ ऑक्टोबर २०१६ रोजी गोळ्यांनी छिन्नविछिन्न होऊनही गुरनाम मागे हटला नाही आणि अखेर भारतमातेच्या कुशीत विसावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's Love: Blanket for Martyred Son's Statue, a Touching Video

Web Summary : A mother in Jammu lovingly drapes a blanket on her martyred son's statue each winter. Gurnam Singh's statue is a symbol of pride, but for his mother, it's still her son. She fulfills her maternal duty even after his sacrifice in 2016.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओIndian Armyभारतीय जवान