शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं आईला, मुलाचाच काढला काटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:09 IST

आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाची निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देमुलानं आईला प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत पाहिलेप्रियकरासोबत मिळून आईनं काढला मुलाचा काटाकापडानं मुलाचा गळा आवळून केली हत्या

नवी दिल्ली - आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राजधानी नवी दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. रविंद्र असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?शनिवारी (26 जानेवारी) रात्री रविंद्र कामाहून घरी परतला तेव्हा त्यानं आईला प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत पाहिले. त्या दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहून रविंद्रचा संताप अनावर झाला. यानंतर तिघांमध्ये वादावादीही झाली. या वादाचे पर्यवसान हत्येच्या घटनेत झाले. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाचाच काटा काढला. रात्रभर मुलाचा मृतदेह तिनं खोलीमध्येच ठेवला.    मुलाचा जीव रस्ते अपघातातून गेल्याचा तिनं भासवण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिनं रुग्णवाहिकादेखील बोलावली. पण आरोपी महिलेनं केलेला गुन्हा फार काळ टिकला नाही. कारण, रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्यानं याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली. यानंतर आरोपी आई त्याच्या मुलासहीत फरार झाली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत रक्तानं माखलेली वीट ताब्यात घेतली. शिवाय, रविंद्रचा मृतदेह ताब्यात घेत तपासदेखील सुरू केला आहे.  

आरोपी महिला 10 मुलांची होती आईपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र मूळचा उत्तर प्रदेशातील खरैया गावातील रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत नवी दिल्लीत भाडेतत्त्वावर राहत होता. रविंद्रचे दोन भाऊदेखील येथेच वास्तव्यास होते. त्याचे वडील गावामध्ये चार मुलींसोबत राहताहेत. यातील तीन मुली विवाहित आहेत.  

पोलिसांना केले गजाआड

पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी आरोपी महिला आपल्या लहान मुलासहीत आझादपूरमधील रहिवासी असलेल्या जावयाच्या घरी पोहोचली. येथे तिनं रविंद्रचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची खोटी कहाणी सांगितली. पण, तिच्या जावयानं पोलिसांनी याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत रविंद्रची कपड्याच्या मदतीनं गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याच्या डोक्यावर विटेचा मारा करुन रविंद्रचा अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा गुन्हा फार काळ लपून राहिला नाही. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींचा छडा लावलाच. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी