शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात माय-बाप गमावले, LICवाले घर जप्तीसाठी मागे लागलेले; पुनावालांनी कर्जाचे 27 लाख रुपये 'फेडले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:47 IST

वनिशाच्या आईवडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. यामुळे ती अनाथ झाली होती. ते दु:ख पचवत असतानाच एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या नोटीसावर नोटीसा धडकू लागल्या...

कोरोना काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. काहींनी तर आई-वडील दोन्ही गमावले आहेत. अशा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी सरकारे मदत करत आहेत. असे असताना १० वीच्या बोर्ड परीक्षेत ९९.८ टक्के मिळविणाऱ्या कोरोनात अनाथ झालेल्या वनिशासमोर मोठे संकट उभे ठाकले होते. कोरोना काळात भारतातच नाही तर जगभरात कोरोना लसीची मदत पोहोचविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटच्या अदार पुनावाला हे वनिशाच्या मदतीला धावले आहेत. 

वनिशाच्या आईवडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. यामुळे ती अनाथ झाली होती. वनिशाच्या वडिलांनी एलआयसी बँकेकडून कर्ज काढून घर घेतले होते. परंतू, कमावता व्यक्तीच गेल्याने घराचे हप्ते थकले होते. नववी, दहावीत शिकणारी वनिशा असे किती पैसे फेडणार होती. तिला आई वडील गेल्याचे दु:ख पचविताना अभ्यासही करायचा होता आणि त्यात बँकेच्या घरावर जप्तीच्या नोटिसाही धडकत होत्या. 

वनिशाने बँकेला पत्र पाठवून काही दिवसांची मुभा मागितली होती. याबाबतचे वृत्त पसरताच अनेक लोक तिच्या समर्थनात आले होते. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीने मदतही केली होती. ही बँक दुसरी तिसरी कोणती नव्हती तर एलआयसी होती. एक पेच असा होता की तिच्या वडिलांनी कर्ज घेताना वारस दाखविला नव्हता. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला होता. अदार पुनावाला देखील वनिशाच्या मदतीला धावले होते. या प्रकरणाची माहिती अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. सीतारामन यांनी देखील एलआयसीला सुनावत यात लक्ष घालण्यास सांगितले होते. 

जेव्हा बँकांच्या नोटीसा येत होत्या तेव्हा वनिशाला  १८ वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती. नोव्हेंबरमध्ये तिला १८ वर्षे पूर्ण झाली. याबरोबर पुनावाला यांनी दिलेला शब्द पाळला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, सीईओ विल्लू पूनावाला फाउंडेशन आणि अदार पूनावाला यांनी तिला गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी रु. 27.47 लाख मदत देऊ केली आहे. 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याLIC - Life Insurance Corporationएलआयसी