शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:59 IST

Mother Dairy Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मदर डेअरीनेही आता ३ जूनपासून सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.

अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मदर डेअरीनेही आता ३ जूनपासून सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाल्याचं मदर डेअरीने म्हटलं आहे.

मदर डेअरीने सोमवारी दुधाच्या सुधारित दराची यादी जाहीर केली. यादीनुसार आता लोकांना मदर डेअरीचं बल्क वेंडेड दूध ५२ ऐवजी ५४ रुपये, टोन्ड दूध ५४ ऐवजी ५६ रुपये, गायीचे दूध ५६ ऐवजी ५८ रुपये, फुल क्रीम दुधासाठी ६६ ऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हशीच्या दुधाला ७० ऐवजी ७२ रुपये आणि डबल टोन्ड दुधासाठी ४८ ऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

दुधाचे भाव का वाढले?

दुधाचे दर वाढण्याचं कारण म्हणजे त्यासाठी येणारा खर्च जास्त असल्याचं दुग्ध व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कडाक्याच्या उन्हात दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. गाई-म्हशींनी दूध देणे बंद केलं किंवा कमी केलं आहे. या कारणांमुळे कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले ​​आहेत.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सोमवारपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. युनियनने म्हटले आहे की, "एकूण कामकाजाचा खर्च आणि दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. आमच्या सदस्य संघटनांनीही गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे ६-८ टक्क्यांनी वाढ केली आहे."

अमूलचे दूध २ रुपयांनी महागले

देशातील सर्वात मोठा दूध उत्पादन संघ अमूलने प्रति लीटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) उद्यापासून म्हणजेच ३ जूनपासून ही दरवाढ लागू केली असून याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. या दरवाढीमध्ये अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्ती आदी उत्पादने आहेत. अमूल ताज नाना पाउच सोडून सर्व दुधाचे दर वाढविण्यात आले आहेत.

नव्या दरवाढीनुसार अमूल गोल्डच्या अर्धा लीटर दुधाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली आहे. अमूल ताजाची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये झाली आहे. अमूल शक्तीची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे. हे दर अहमदाबादमधील आहेत. महाराष्ट्रासह देशभरात या दरात बदल होऊ शकतात. अमूलने दरवाढ केल्यानंतर आता मदर डेअरी सारख्या कंपन्याही त्यांच्या दूध दरात वाढ करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :milkदूध