शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये हनीप्रीत टॉपला, नेपाळमध्ये असल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 19:06 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी 43 जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर केली आहे.

चंदीगड, दि. 19 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी 43 जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये राम रहीमची मानस मुलगी हनीप्रीत सिंग आणि डेसा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्सा यांची नावे टॉपला आहेत. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. तसेच, यामध्ये पोलिसही जखमी झाले. दरम्यान, या हिंचारानंतर हनीप्रीत सिंग फरार आहे. हनीप्रीत हिच्यासह डेरा सच्चा सौदाच्या इतर फरार अनुयायांना शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.राम रहीम याला शिक्षेनंतर न्यायालयातून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप हनीप्रीत सिंग आणि आदित्य इन्सा यांच्यावर आहे. याचबरोबर, याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा कार्यकर्ता प्रदीप गोयल इन्सा आणि प्रवक्ता आदित्य इन्साचा नातेवाईक प्रकाश यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.हिंसाचारप्रकरणी 43 जणांची जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. हरयाणा पोलिसांच्या संकेतस्थळावर हि लिस्ट त्यांच्या फोटोंसह अपलोड करण्यात आली आहे. तसेच, या मोस्ट वाँटेड लिस्टमधील व्यक्तीची माहिती जो कोणी पोलिसांनी देईल, त्यांनी नावे गुपित ठेवण्यात येतील, असे पंचकुला पोलीस आयुक्त एएस चावला यांनी सांगितले. दरम्यान, हनीप्रीत सिंगविरोधात हरयाणा पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही. मात्र, ती सध्या फरार असून नेपाळमध्ये असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम