शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुजरातमधून सर्वाधिक ड्रग्ज, बेहिशेबी मुद्देमाल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:49 IST

लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी नेते धनाच्या बळाचाही वापर करताना दिसत आहेत.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी नेते धनाच्या बळाचाही वापर करताना दिसत आहेत. देशात सहा टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी आहे. आतापर्यंत झालेल्या कारवाईत ड्रग्स, दारू, सोने, चांदी, रोकड व अन्य वस्तू मिळून २,५०४ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे. सर्वाधिक मुद्देमाल गुजरातमधून हस्तगत करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ४८,८०४ किलोपेक्षा अधिक ड्रग्स पकडण्यात आले आहे. याची किंमत १,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय २०७ कोटी रुपये किमतीची १०४ लाख लीटर दारू आणि ५०० कोटी रुपयांचे सोने, चांदी व अन्य धातू, तसेच ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. गुजरातमध्ये सर्वाधिक ५१७ कोटी, तामिळनाडूत ४७९ कोटी, दिल्लीत ३९८ कोटी आणि आंध्र प्रदेशात २१६ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक ५.६ कोटींचे १४,६७८ किलो ड्रग्स आणि जवळपास २० कोटी रुपयांची २६ लाख लीटर दारू पकडण्यात आली. अर्थात, सर्वाधिक किमतीचे ड्रग्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात गुजरातमध्ये जप्त करण्यात आले. येथे १२३ किलो ड्रग्ज पकडण्यात आले. याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. या राज्यात १० कोटींची दारूही जप्त करण्यात आली. राजधानी दिल्लीत २४९ आणि पंजाबमध्ये १५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, देशभरात आतापर्यंत ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १८३ कोटी तामिळनाडू, १३७ कोटी आंध्र प्रदेशमधून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर, तेलंगणा ६८ कोटी, उत्तर प्रदेश ३५ कोटी, दिल्ली ३२.५ कोटी आणि कर्नाटक ३० कोटी, याप्रमाणे रोकड जप्त करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी माहिती दिली की, आतापर्यंत सोने-चांदी यासारख्या मूल्यवान धातूंची जप्ती करण्यात आली आहे. याची किंमत ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात २४८ कोटी रुपयांचे धातू एकट्या तामिळनाडूत जप्त करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात ६८ कोटी, महाराष्ट्रात ४४ कोटी आणि आंध्र प्रदेशात ३३ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले आहेत.>निवडणुकीदरम्यान हस्तगत साहित्याचा तपशीलराज्य एकूण दारू ड्रग्ज रोकड(कोटी रु.) (लाख ली.) (किलो) (कोटी रु.)गुजरात ५१७ ३.३९ १२३.८६ ५.९६तामिळनाडू ४७९ १.८९ --- १८३दिल्ली ३९८ ०.७१ --- ३२.५४आंध्र प्रदेश २१६ २६.१९ --- १३७महाराष्ट्र १०९ २६.१५ १४,६७८ ३९मध्य प्रदेश ३५.४५ २६.१५ ६,६३६ १४.२३उत्तर प्रदेश १६२ १४.३४ १८,८१४ ३५.५३देशभरातून २५०४ १०४ ४८,८०४ ६४७.५४

टॅग्स :MONEYपैसा