शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:34 IST

काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवरुन मोठा दावा केला आहे.

Congress Kumar Ketkar:काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी षडयंत्र रचले होते, असे मत कुमार केतकर त्यांनी व्यक्त केले.

संविधान दिनानिमित्त काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, राज्यसभा सदस्य राहिलेल्या केतकर यांनी २०१४ च्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १४५ जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत ही संख्या वाढून २०६ पर्यंत पोहोचली होती. जर हाच क्रम सुरू राहिला असता, तर २०१४ मध्ये काँग्रेस २५० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत आली असती. मात्र, २०१४ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट ४४ पर्यंत खाली आल्या. हा आकड्यांमधील अचानक आलेला बदल अत्यंत आश्चर्यकारक आहे," असे कुमार केतकर यांनी म्हटले.

'काँग्रेसला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळ'

केतकर यांनी दावा केला की, २०१४ च्या निवडणुकीपूर्वीच हा खेळ'सुरू झाला होता आणि काँग्रेसच्या जागा वाढू नयेत असा निर्णय घेण्यात आला होता. "अशा संस्था होत्या ज्यांनी जोपर्यंत आपण काँग्रेसला २०६ च्या खाली आणत नाही, तोपर्यंत आपण येथे (भारतात) आपले काम करू शकणार नाही, या पद्धतीने काम केले. यापैकी एक संघटना सीआयए होती आणि दुसरी इस्रायलची मोसाद होती," असं केतकर यांनी म्हटलं.

या दोन्ही गुप्तचर संस्थांनी भारतात हस्तक्षेप करण्यासाठी आणि आपली धोरणे लागू करण्यासाठी एक अनुकूल सरकार आणण्याचे ठरवले होते. जर काँग्रेसचे स्थिर सरकार किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आले असते, तर त्यांना भारताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करता आला नसता, असा दावा केतकर यांनी केला. त्यांच्या मते, सीआयए आणि मोसाद या दोन्ही गुप्तचर संस्थांना वाटत होतं की, भारतात त्यांचे नियंत्रण असलेले अनुकूल सरकार असले पाहिजे आणि ते काँग्रेसचे नसावे.

केतकर यांनी मोसादवर थेट आरोप करताना म्हटले, "मोसादने राज्ये आणि मतदारसंघांचा विस्तृत डेटा तयार केला आहे. सीआयए आणि मोसादकडे राज्ये आणि मतदारसंघांचा विस्तृत डेटा आहे. " २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल काही प्रमाणात असंतोष असला तरी, काँग्रेसच २०६ वरून थेट ४४ जागांवर येईल, इतका असंतोष नक्कीच नव्हता, असा दावा केतकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात आणि खासकरून काँग्रेसच्या गोटात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CIA, Mossad plotted to defeat Congress: Kumar Ketkar's sensational claim.

Web Summary : Kumar Ketkar alleges CIA and Mossad conspired to defeat Congress in 2014, favoring BJP. He questions the drastic drop in Congress seats, suggesting international interference to prevent a Congress-led government and enable favorable policy implementation.
टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा