शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ३४,००० हून अधिक प्रवासी करतात 'वंदे भारत'ने वेगवान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:21 IST

आरामदायी प्रवासाचा अनुभव, सरासरी १२० किमी प्रतितास वेग; चेन्नईनंतर आता लातूरमध्येही हाेणार डब्यांची निर्मिती

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वे प्रवाशांना गतिवान आणि आरामदायी सेवा देणारी सेमी हायस्पीड रेल्वेसेवा म्हणून 'वंदे भारत'कडे पाहिले जाते. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या 'वंदे भारत' रेल्वेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील ७ मार्गांसह देशांतील एकूण २०,५०० किमीच्या ४१ मार्गांवर ही सेवा सुरू आहे.

दररोज सरासरी ३४,००० प्रवासी १२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत'चा लाभ घेत आहेत. 'वंदे भारत'ची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत केली जाते. पुढील काही वर्षांत लातूर येथेही 'वंदे भारत'ची निर्मिती केली जाणार आहे.

राज्यातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकी राज्यात मुंबई-सोलापूरला १०८ टक्के, देशात नागपूर-बिलासपूरला सर्वाधिक १२२ टक्के भारमान असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव मार्गावरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसला प्रवाशांचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जालना-मुंबई सेवेलाही प्रवाशांची पसंती मिळत आहे. बहुतांश मार्गांवरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसचे भारमान ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील प्रस्तावित फेऱ्या

  • मुंबई-अहमदाबाद
  • मुंबई सीएसएमटी-शेगाव
  • पुणे-शेगाव
  • पुणे-बेळगाव
  • पुणे-बडोदा
  • पुणे-सिकंदराबाद
  • मुंबई एलटीटी-कोल्हापूर

महाराष्ट्रातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या सेवा

मार्ग (डब्यांची संख्या)    उद्घाटन    अंतर

  • मुंबई सेंट्रल-गांधीनगर (८)     ३० सप्टेंबर २०२२     ५२२ किमी
  • नागपूर बिलासपूर(८)     ११ डिसेंबर २०२२     ४१२ किमी
  • मुंबई-सोलापूर(१६)     १० फेब्रुवारी २०२३     ४५४ किमी
  • मुंबई-शिर्डी (१६)     १० फेब्रुवारी २०२३     ३४१ किमी 
  • मुंबई-मडगाव(८)     २७ जून २०२३      ५८१ किमी
  • नागपूर-इंदूर(८)    २७ जून २०२३      ६३६ किमी 
  • मुंबई-जालना (८)      ३० डिसेंबर २०२३     ४३५ किमी
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस