शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:30 IST

गेल्या दोन वर्षांत ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात बनावट बॉम्बच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत विमान प्रवासादरम्यान बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा घटनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, सरकारने संसदेत सादर केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. 

गेल्या दोन वर्षांत ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे. २८ नोव्हेंबर रोजी लोकसभेत माहिती देताना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्री म्हणाले की, ऑगस्ट २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण ११४८ बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. कॉल आणि मेसेजद्वारे या धमक्या देण्यात आल्या आहेत.

२०२४ या वर्षात ११ महिन्यांत ९९९ बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे विमानांचे उड्डाण करण्यात अडचणी निर्माण होतात आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यातही त्रास होतो, कारण एकदा धोका आल्यावर संपूर्ण तपास केला जातो, त्यामुळे उड्डाणाला विलंब होतो.

काय कारवाई झाली?बॉम्बच्या या बनावट धमक्यांबाबत काय कारवाई करण्यात आली, याबद्दलही सरकारने सांगितले. जानेवारी २०२४ पासून अशा प्रकरणांमध्ये २५६ एफआयआर आणि १२ जणांना अटक करण्यात आली आहेत. १४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १६३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ही एक प्रकारची वाढ आहे.

सरकार कायद्यात बदल करणार?मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित कायदे बदलायला हवेत, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत सरकार सरकारी विमान (सुरक्षा) नियम, २०२३ मध्ये बदल करू शकते, असे म्हटले जाते. बॉम्बच्या बनावट धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. याशिवाय, सरकार सुरक्षेशी संबंधित उपायांचा सतत आढावा घेत आहे.

टॅग्स :airplaneविमानParliamentसंसदlok sabhaलोकसभा