शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:16 IST

माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

डेहराडून : उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या महापुरामुळे अडकलेल्या ४००हून अधिक लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून, १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, हर्षिल भागात असलेल्या लष्करी छावणीतून बेपत्ता झालेले एक अधिकारी व आठ जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. दगड-मातीचे ५० ते ६० फूट उंचीचे ढिगारे धरालीमध्ये असून, याखाली लोकांचा शोध घेतला जात आहे.

२२५ जणांचे बचाव पथकबचावकार्यात अभियंते, वैद्यकीय कर्मचारी तसेच तज्ज्ञांसह २२५ जण सहभागी आहेत. तसेच अडकलेल्यांचा शोध घेण्याची क्षमता असलेले प्रशिक्षित श्वानही या भागात तैनात आहेत.

३०० यात्रेकरू सुरक्षितढगफुटीदरम्यान गंगोत्रीजवळ अडकलेल्या ३०० यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या मदतीने हर्षिल भागात आणण्यात आले असून, हे यात्रेकरून सुरक्षित आहेत. यात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह दक्षिणेतील यात्रेकरूंचा समावेश आहे. 

मग महापूर आला कुठून? ढगफुटीमुळे धरालीत प्रकोप झाल्याचे मानले जात असले तरी हवामान विभागाकडे असा डेटाच नाही. २० ते ३० चौ. किमी क्षेत्रात १ तासात १०० मिमीहून अधिक पाऊस हा ढगफुटी मानली जाते. परंतु, प्रत्यक्षात या भागात २७ मिमी पावसाचीच नोंद आहे. मग हा पूर आला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरDeathमृत्यू