शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा एक लाख कोटींचा जादा खर्च; लोकशाही संकेतांचे गंभीर उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:24 IST

मोदी सरकारने २०१७-१८ या वित्तीय वर्षात संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे मंजूर केलेल्या रकमेहून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा वाढीव खर्च केला, असा ठपका भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने २०१७-१८ या वित्तीय वर्षात संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे मंजूर केलेल्या रकमेहून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा वाढीव खर्च केला, असा ठपका भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला आहे.केंद्र सरकारच्या गत वर्षातील हिशेबांचे वित्तीय लेखापरीक्षण करून ‘कॅग’ने तयार केलेला अहवाल संसदेत सादर करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, खालपासून वरपर्यंतच्या सर्वच प्राधिकाऱ्यांनी नियमांचे पालन केले नाही व त्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली नाही. परिणामी २०१७-१८ या वर्षात सरकारकडून संसदेने मंजूर केलेल्या रकमेहून ९९,६१० कोटी रुपयांचा जास्त खर्च झाला.‘कॅग’ने म्हटले की, लोकशाहीत जनता सार्वभौम असते व संसद जनतेच्या त्या सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच संसदेने मंजुरी दिल्याशिवाय सरकारने भारताच्या संचित निधीतून एक रुपयाही खर्च न करणे हे लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत तत्त्व आहे. याचे उल्लंघन ही गंभीर दखल घेण्यासारखी बाब आहे.एकट्या वित्त मंत्रालयाने या अहवालात वर्षात संसदेची मंजुरी न घेता विविध बाबींवर १,१५७ कोटी रुपये जास्त खर्च केले, असे नमूद केले गेले. या वर्षात सरकारने संसदेकडून मंजूर करून घेतलेल्या १५ पुरवणी मागण्यांची रक्कम अजिबात खर्च केली नाही. यापैकी ज्या ११ प्रकरणांत ११,०१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या होत्या, त्यात मंजूर करून घेतलेली मूळ रक्कमही पूर्णपणे खर्च केली गेली नाही, याचीही अहवालात प्रकर्षाने नोंद घेण्यात आली. सदोष अंदाजपत्रकीय अंदाज तयार केले गेल्याने मंजूर तरतुदीहून कमी किंवा जास्त खर्च केला जाण्याने वित्तीय शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन होण्याची लोकलेखा समितीनेही त्यांच्या ८९ व्या अहवालात गंभीर दखल घेतली होती.नियमभंगावर बोटकोणत्याही अधिभाराच्या रूपाने गोळा होणारी रक्कम स्वतंत्र निधी स्थापन करून त्यात जमा करायची व फक्त त्याच कामासाठी खर्च करायची, असा नियम आहे. मात्र, २०१७-१८ मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिभारातून गोळा झालेली ९४,०३६ कोटी रुपयांची रक्कम स्वतंत्र निधीत जमा न करता भारताच्या संचित निधीत टाकली गेली. या नियमभंगावरही ‘कॅग’ने बोट ठेवले.

टॅग्स :Parliamentसंसद