शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 14:02 IST

अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६१ ते ७० वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव असलेल्या तिसऱ्या लाटेत मात्र या वयोगटात किंचितसा बदल झाला आहे. तिसऱ्या लाटेत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील तब्बल २८.११ टक्के मृत्यू हे ७१-८० वयोगटातील असल्याचे समोर आले.

अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते. २०२१ वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८८,९१५ मृत्यूंपैकी जवळपास २७.५ टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातीलच होते. त्यानंतर जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंतच्या २,३३७ मृत्यूंपैकी २८.११ टक्के मृत्यू ७१-८० वयोगटातील आणि ६१-७० वयोगटातील मृत्यू या काळात २३ टक्क्यांपर्यंत कमी झाले. २०२० आणि २०२१ मध्ये ७१-८० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १९.८७ टक्के व १७.८ टक्के होते. तेच २०२२ मध्ये वाढलेले दिसले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन या प्रकाराचा प्रादुर्भाव अधिक दिसला. बहुसंख्य आणि गंभीर अन्य आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तसेच ७१ ते ८० वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी ६१-७० वर्षे वयोगटाच्या तुलनेत ७१ ते ८० वयोगटातील लोकांवर अधिक परिणाम झाल्याचे ते सांगतात. - डॉ. अविनाश सुपे, कोविड-१९ मृत्यू लेखापरीक्षण समितीचे प्रमुख

तत्काळ लसीकरण पूर्ण करा -सेव्हन हिल्स रुग्णालयातील एका तज्ज्ञ डॉक्टरने सांगितले, तिसऱ्या लाटेत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये ७० हून अधिक वयोगटातील रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यातील अनेकांना प्रामुख्याने अतिदक्षता विभागात दीर्घकाळ उपचार करण्यात आले. त्यामुळे अशावेळी या वयोगटात मृत्यूची शक्यता जास्त होती. कोविड रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्यांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे आणि संसर्गापासून दूर राहण्यासाठी वर्धक मात्रा घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यू