शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उत्तर प्रदेशात महाआघाडीला मिळतील 60 पेक्षा जास्त जागा, आपचे नेते संजय सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:01 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातही सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होणार, असा दावा आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतरच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा करण्यासाठी आपचे नेते संजय सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशाच महाआघाडीला मोठा विजय मिळेल, असे भाकीत केले.''उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा महाआघाडी 60 हून अधिक जागा जिंकणार, तर उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात भाजपा भुईसपाट होईल. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यावेळीही एक्झिट पोल खोटे ठरतील. तसेच विरोधी पक्ष केंद्रात एक मजबूत सरकार स्थापन करतील,''असे संजय सिंह म्हणाले. 

 यावेळी अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या चर्चेबाबतही संजय सिंह यांनी संक्षिप्त माहिती दिली. ''लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनंतर जाही होणार आहे. त्यामुळे निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही चर्चा केली. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यास आमचे प्राधान्य आहे.'' असे संजय सिंह यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान, रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने येथील निकालांबाबतचा संभ्रम वाढला आहे. एकीकडे इंडिया टुडे-माय अॅक्सिस, टुडेज् चाणक्यसारख्या संस्थांनी उत्तर प्रदेशात भाजपाला बंपर यश मिळेल असे भाकीत केले आहे. तर एबीपी-नेल्सन आणि सी-वोटरसारख्या सर्वेक्षण संस्थानी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावतींच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच आघाडीवर राहील असा अंदाज वर्तवला आहे.  विविध संस्थांच्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास टाइम्स  नाऊ व्हीएमआरने भाजपाला 58, महाआघाडीला 20 तर काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. तर इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने भाजपाला 62 ते 68, महाआघाडीला 10 ते 16 आणि काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. त्याशिवाय न्यूज 24-टुडेज चाणक्यनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 65 तर महागठबंधनला 13 आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत. रिपब्लिक-जन की बात ने भाजपाला 46 ते 57 तर महाआघाडीला 15 ते 29 जागा आणि काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.  तर एबीपी-नेल्सनने आपल्या एक्झिट पोलचा कौल महाआघाडीच्या पारड्यात टाकला आहे. एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 33 तर महाआघाडील 45 जागा आणि काँग्रेसला केवळ 2 जागा मिळतील. सी-वोटरनेही उत्तर प्रदेशात महाआघाडीचे पारडे जड दाखवले आहे.  सी-वोटरच्या पोलनुसार भाजपाला 38 तर महाआघाडीला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीAAPआपLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९