शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये १२ हजारांहून अधिक बिबटे; ६० टक्क्यांनी वाढली संख्या, राज्यात दुपटीहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:03 IST

leopards : ‘भारतातील बिबट्यांची स्थिती २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार भारतात किमान १२,८५२ बिबटे आहेत.

नवी दिल्ली : भारतात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असून देशात किमान १२,८५२ बिबटे असल्याची माहिती केंद्रीय पर्यायवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे.जावडेकर यांनी ‘भारतातील बिबट्यांची स्थिती २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार भारतात किमान १२,८५२ बिबटे आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या गणनेनुसार देशात सुमारे ८००० बिबटे असल्याची नाेंद झाली हाेती. चार वर्षांमध्ये तब्बल ४८०० हून अधिक बिबटे वाढले आहेत. सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशमध्ये असून त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागताे. गेल्या काही वर्षांमध्ये वाघ, सिंह आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे. हे आकडे भारतातील उदात्त वन्यजीवसंपदा आणि जैवविविधतेची साक्ष देत असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बिबट्यांची सुमारे ५१ हजार छायाचित्रे काढण्यात आली हाेती. शरीरावरील ठिपक्यांच्या पॅटर्नवरून केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.यावर्षीच्या सुरुवातीला केलेल्या एका अभ्यासामध्ये पश्चिम घाट, दख्खनचे पठार, शिवालीक पर्वत आणि उत्तर भारतातील तेराई प्रांतातील बिबट्यांच्या प्रजातींमध्ये उच्च अनुवांशिक भिन्नता आढळली हाेती. 

वाघांचा संचार असलेल्या राज्यांमध्येच बिबट्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील एकूण बिबट्यांची संख्या१२,८५२ हून बरीच जास्त असू शकते, असे अहवालात महटले आहे. देशात १२ ते १४ हजार बिबटे असल्याचा अंदाज २०१६ मध्ये व्यक्त करण्यात आला हाेता. 

महाराष्ट्रात मृत्यू वाढले

-  महाराष्ट्रात बिबट्यांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. यावर्षी त्यात ५७ टक्के वाढ झाली आहे. राज्यात नाेव्हेंबरपर्यंत १७३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. -  सर्वाधिक ७० मृत्यू नाशिक जिल्ह्यात, तर पुणे आणि काेल्हापुरात प्रत्येक २६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.  यापैकी ६४ मृत्यू हे अपघाती असून १७ बिबट्यांची शिकार झाली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या