शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर 1200 काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिली AMU सोडण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 12:07 IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) चर्चेत आले आहे.

अलिगढ - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी मन्नान वाणीचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर आता विद्यापीठातील 1200 काश्मीरी विद्यार्थ्यांनी AMU सोडण्याची धमकी दिली आहे. AMU च्या विद्यार्थी संघाचा माजी नेता सज्जाद सुभानने AMU प्रशासनाला एक पत्र लिहून मागण्या मान्य केल्या नाहीत तर विद्यापीठातील 1200 विद्यार्थी त्याचं शिक्षण सोडून काश्मीरमध्ये परत जातील अशी धमकी दिली आहे.  मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांचं निलंबित केले आहे. मात्र सज्जाद सुभानने अशा प्रकारे कोणतीही सभा झाली नसून केवळ काश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्याचा दावा केला आहे. तसेच जर विद्यार्थ्यांवर असलेल्या केस मागे घेतल्या नाही तर काश्मिरी विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील असेही त्याने म्हटलं आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता. मात्रजम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतल्याची माहिती समोर आली होती.

याप्रकरणी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर अन्य चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड तपासला जाणार आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यापासून रोखले होते. विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सभेच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यासाठी नमाज अदा करणे योग्य नव्हे, असे सांगत या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :Mannan Waniमन्नान वानीterroristदहशतवादीuniversityविद्यापीठ